बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणजेच सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच लक्झरी लाइफबद्दलही चर्चेत असतो. तुम्ही अभिनेत्याचे मुंबईतील घर अनेकदा पाहिले असेल, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या फार्म हाऊसची इनसाइड फाेटाे दाखवणार आहाेत. सलमान खानचे हे आलिशान फार्महाऊस पनवेलमध्ये आहे, ज्याचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.
शहरातील गर्दीपासून दूर शांततेचे क्षण घालवण्यासाठी अभिनेता सलमान खान (salman khan) पनवेल फार्महाऊसला येताे. इथे येऊन सलमान अतिशय साधे जीवन जगतो आणि सामान्य शेतकऱ्यांसोबत त्याच्या शेतात शेतीही करतो.
View this post on Instagram
पणवेल फार्महाऊसवर घोडेस्वारीची सुविधा आहे उपलब्ध
सलमानचे फार्महाऊस मुंबईपासून दूर असले तरी त्यात घोडेस्वारीपासून जिम आणि स्विमिंग पूलपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्याची रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूर देखील तिच्या सुट्ट्यांमध्ये येथे घोडेस्वारी करायला येते.
View this post on Instagram
हे फार्महाऊस अभिनेत्याची बहीण अर्पिता खानच्या नावावर आहे. जे 150 एकर क्षेत्रात पसरलेले आहे, ज्यामध्ये एक मोठा बगीचाही आहे. जिथे सर्व प्रकारची झाडे लावली जातात. सलमान आणि अर्पिताच्या फार्म हाऊसमध्ये लिव्हिंग रूमपासून किचनपर्यंत सर्व ठिकाणी व्हाइट कलर देण्यात आला आहे. यासोबतच त्याला क्लासी लूक देण्यासाठी अनेक ठिकाणी वुडन वर्क करण्यात आले आहे. जी खूप सुंदर दिसते.
सलमानशिवाय त्याचे भाऊ सोहेल, अरबाज आणि त्यांचे खास मित्र अनेकदा येथे व्हेकेशनसाठी जातात. त्याचवेळी, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सलमान देखील इथेच राहिला. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीनही येथे सुट्टी घालवताना दिसली.
View this post on Instagram
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान अलीकडेच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसला होता. अशात आता लवकरच तो ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे.
(bollywood actor salman khan panvel farmhouse inside photos and videos)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
एका हातात युग, तर दुसऱ्या हातात न्यासा; घामात लदबद झालेल्या काजाेलचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल