Sunday, December 3, 2023

अर्जुन बिजलानीच्या नवीन शोचा दमदार ट्रेलर रिलीज, ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता

लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी त्याच्या आगामी टीव्ही मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘प्यार का पहला अध्याय: शिवशक्ती’ या नवीन काल्पनिक मालिकेसह अभिनेता पुनरागमन करत आहे. या शोचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी अर्जुनने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. ‘प्यार का पहला अध्याय: शिवशक्ती’च्या शूटिंगसाठी अर्जुन बनारसला गेला आहे. अशात अभिनेता सध्या तिथे शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सगळ्यामध्ये आता अभिनेत्याने शोचा प्रोमो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

अर्जुन बिजलानी (arjun bijlani ) याने आगामी शो ‘प्यार का पहला अध्याय: शिवशक्ती’चा प्रोमो त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. या शोमध्ये अर्जुनसोबत अभिनेत्री निक्की शर्माही दिसणार आहे. प्रोमोमध्ये, निक्की (शक्तीची) भूमिका साकारणार आहे, तर अर्जुन (शिवाची) भूमिका साकारत आहे. प्रोमो शेअर करताना अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “शिवाचे तुटलेले तुकडे एकत्र करून, शक्ती पूर्ण करू शकेल का त्याला ? माहितीसाठी बघा #प्यार का पहला अध्याय: शिवशक्ती, 3 जुलैपासून संध्याकाळी 7:30 वाजता, फक्त @zeetvवर.”

अर्जुन बिजलानीचे चाहते करत आहेत अभिनंदन
अर्जुन बिजलानीने प्रोमो शेअर करताच, चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल खूप आनंदी आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bijlani ???? (@arjunbijlani)

माध्यमातील वृत्तानुसार, ‘प्यार का पहिला अध्याय: शिव शक्ती’ हा राधा मोहनचा स्पिनऑफ आहे, ज्यात शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय मुख्य भूमिकेत आहेत. अशात ‘प्यार का पहिला अध्याय: शिवशक्ती’मध्ये अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. हा कार्यक्रम झी टीव्हीवर 3 जुलैपासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे. (tv actor arjun bijlani and nikki sharma new show pyaar ka pehla adhyay shiv shakti new promo release)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
सनी लियोनीच्या लेटेस्ट फोटोशूटने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा