Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या, दुबईत करत हाेती उघडपणे ‘हे’ कृत्य; पाेलिसांनी घेतले ताब्यात

उर्फी जावेद नेहमीच रंगीबेरंगी कपडे घालून रस्त्यावर फिरत असते. उर्फीला यासाठी अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील तीला याचा काहीही फरक पडत नाही, पण उर्फीचे हेच कृत्य तिच्यावर भारी पडले आहे. उर्फीने पुन्हा एकदा रिवीलिंग कपडे परिधान केल्याबद्दल अडचणींना आमंत्रण दिले आहे. त्यानंतर तिची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उर्फी जावेद (urfi javed) गेल्या अनेक दिवसांपासून प्रोजेक्ट्सच्या शूटिंगच्या निमित्ताने दुबईत आहे. उर्फीने तिथेही स्वत:मध्ये सुधारणा केली नाही आणि दुबईमध्ये रिवीलिंग ड्रेस परिधान केला. अशात अभिनेत्री दुबई सरकारच्या निदर्शनास आली. उर्फीने दुबईमध्ये तिच्या इंस्टाग्रामसाठी स्वत: तयार केलेल्या पोशाखात एक व्हिडिओ शूट केला. दुबईतील लोकांना उर्फीचा पोशाख खूपच रिवीलिंग वाटला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीचे भारतात येण्याचे तिकीट ढकलू शकतात पुढे
उर्फी जावेदने एका मोकळ्या जागेत तिचा व्हिडिओ शूट केला. दुबईच्या नियमांनुसार, त्या ठिकाणी रिवीलिंग कपडे परिधान करून शूट करण्याची परवानगी नाही. आता दुबई पाेलिस याबाबत उर्फीकडे चौकशी करत आहेत. दुबई पोलीस उर्फीचे भारतात येण्याचे तिकीटही पुढे ढकलू शकतात, असे बोलले जात आहे. उर्फी अनेकदा तिच्या कपड्यांवरून वादात अडकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीला बला’त्कार आणि जीवे मारण्याची धमकी
काही दिवसांपुर्वीच उर्फी जावेदची प्रकृती खालावली होती. घशाच्या संसर्गामुळे उर्फीला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. बोल्ड कपड्यांमुळे उर्फीला बला’त्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत, पण तरीही ती स्पष्ट आणि बोल्ड पद्धतीने जगते.(tv actress urfi javed detained in dubai for filming herself in revealing dress publicly report)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी त्याच्यापेक्षा 1000 पटींनी चांगला होतो, मला का नाकारलं?’, देवोलीनाच्या लग्नामुळे ‘हा’ अभिनेता भावूक

पळा पळा! पतीसोबत असताना नयनताराला चाहत्यांनी घेरले, गर्दीतून धावतानाचा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा