Friday, March 29, 2024

पळा पळा! पतीसोबत असताना नयनताराला चाहत्यांनी घेरले, गर्दीतून धावतानाचा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

नयनतारा हिची गणना साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये होते. नयनताराने सिनेसृष्टीला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. ती आता 22 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘कनेक्ट’ या सिनेमात झळकणार आहे. नुकतीच ती सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. यादरम्यान तिच्यासोबत तिचा पती आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन देखील होता. मात्र, यादरम्यान अभिनेत्री चाहत्यांच्या गर्दीत अडकली. त्यानंतर तिने एकच धूम ठोकली. यादरम्यानचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल
या स्क्रीनिंगदरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नयनतारा (Nayanthara) ही चाहत्यांच्या गर्दीतून धावताना दिसते. सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी नयनतारा तांबड्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पोहोचली होती. दुसरीकडे, तिचा पती आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन हा जीन्स आणि पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये होता. जेव्हा ते स्क्रीनिंगसाठी चित्रपटगृहात दाखल झाले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यावेळी सर्व कॅमेरे तिच्यावरच होते. सुदैवाने नयनतारा गर्दीतून वाचली आणि सुरक्षितरीत्या बाहेर पडण्यात यशस्वी झाली.

हॉररने भरलाय ‘कनेक्ट’चा ट्रेलर
‘कनेक्ट’ (Connect) या सिनेमाचा ट्रेलर या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज करण्यात आला होता. नयनतारा या सिनेमात आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा सिनेमा गुरुवारी (22 डिसेंबर) चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी मणिकांतन यांनी केले आहे. तसेच, सिनेमाचे संगीतकार पृथ्वी चंद्रशेखर आहेत. त्यांनी ‘कनेक्ट’ ट्रेलरला दिलेल्या आकर्षक बॅकग्राऊंड स्कोरने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ट्रेलरवरून स्पष्ट होते की, या सिनेमाने टॉलिवूडमध्ये हॉरर शैलीची व्याख्या नव्याने समोर आणली आहे.

विशेष म्हणजे, निर्मात्यांनी 90 मिनिटांचा ब्रेक फ्री हॉरर सिनेमा देण्याचे वचन दिले आहे. तमिळ सिनेमात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सिनेमा कोणत्याही ब्रेकशिवाय चित्रपटगृहात सुरू राहील. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिने आणि विग्नेश यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांचे स्वागत केले. त्यामुळेही ते भलतेच चर्चेत होते. (fans surrounded actress nayanthara at the screening of connect she was seen running in the crowd see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोनालिसाने ‘अंग लगा…’वर कंबर लचकवत वेधले चाहत्यांचे लक्ष; ठुमका पाहून चाहताही म्हणाला, ‘जीवच जाईल’
आली लहर केला कहर! ‘आरआरआर’ने जगातल्या सर्वोत्तम 50 सिनेमांच्या यादीत टॉम क्रूझलाही टाकलं मागं

हे देखील वाचा