Saturday, July 27, 2024

धक्कादायक! उर्फी जावेदला बला’त्कार आणि जिवे मारण्याची धमकी

सतत आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्सने लोकांना हैराण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली. मात्र, यावेळेस कारण खूप वेगळं आहे. कधी काच, गोणी, दगडांपासून, तर कधी प्लास्टीकचे कपडे तयार करुन आणि ते परिधान करुन पब्लीकमध्ये उतरणं हे धैर्य दाखवणाऱ्या उर्फीला जिवे मारण्याची आणि बला’त्कार करण्याची धमकी मिळाली आहे.

सोशल मीडिया इन्फुलुएंसर म्हणून उर्फी जावेद (Urfi Javed) हिला ओळखले जाते. सतत आपल्या नवनवीन फॅशेनमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी उर्फी अनेकदा ट्रोलही झाली आहे. तिच्या कपड्यांवरुन अनेक नेटकरी तिला ट्रोलही करत असतात मात्र, यावेळेस थेट अपमानास्पद ऑडिओ क्लिप आणि बलात्काराच्या धमक्या उर्फीला मिळाल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्री खूपच घाबरली आहे. माध्यामातील वृत्तानुसार उर्फीने ने शुक्रवार (दि, 16 डिसेंबर) रोजी ऑडिओ क्लिप आणि बलात्काराच्या धमक्या पाठवल्याप्रकरणी एका दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजन गिरी (Ranjan Giri) म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या आरोपीने तिला धमकी दिल्याचे सांगितले आहे.

अनेक दिवसांपासून मिळालेल्या धमक्यांमुळे उर्फीने गुरुवार (दि, 15 डिसेंबर) रोजी तिने ट्वीटरवर मुंबई पोलिसांना टॅग केले आणि लिहिले की, “मला एका व्यक्तीकडून दररोज बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मी भारतात नसल्यामुळे मी अधिकृत तक्रार दाखल करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही, पण या व्यक्तीची सर्वांना ओळख करून देण्यासाठी येथे त्याचा फोटो आहे @MumbaiPolice @CPMumbaiPolice.”

उर्फीने हे ट्वीट शेअर करत धमकी देणाऱ्या व्यक्तीचा फोटो आणि पाठवलेली धमकीचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहेत. मुंबई पोलिसांनी तिच्या ट्वीटला प्रतिउत्तर देत तिच्याशी संवाद साधला आहे. तिच्या समस्या सविस्तरपणे ऐकल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी लगेच कारवाई करण्यासा सुरुवात केली आहे. पोलीस ठाण्यातील एका महिला उपनिरीक्षकाने गिरीविरोधात एफआयआर नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत, असं गोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी जाधव यांनी सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! ऑस्कर विजेत्या चित्रपटाच्या अभिनेत्रीला इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल अटक
शाहरुखच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘किंग खान’ला झाले इन्फेक्शन, फक्त भात खाऊन काढतोय दिवस

हे देखील वाचा