टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदच्या दिवसाची सुरुवात साेशल मीडियावर एक तडकती – फडकती पाेस्ट शेअर करून हाेते. ती अनेकदा अशा गोष्टींपासून कपडे बनवते, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. तिचे नाव डोळ्यासमोर येताच ती यावेळी काय नवीन करणार असा विचार नेटकऱ्यांना पडताे. अशातच उर्फी पुन्हा एकदा तिच्या अतरंगी फॅशनसह चर्चेत आली आहे. यावेळी काय केले उर्फीने? चला, जाणून घेऊया…
उर्फी जावेद (urfi javed) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये उर्फी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर टॉपलेस झालेली दिसत आहे. खरेतर उर्फीने टॉप न घालता गुलाबाच्या पाकळ्या चिकटवल्या आहेत आणि तिचे शरीर झाकलेले आहेत. यासाेबतच उर्फीने राखाडी रंगाची पॅंट घातली असून उंच पोनीसह तिला लूक पुर्ण केला आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेदचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे, तर चाहतेही या फोटोवर भिन्नभिन्न कमेंट करत आहे. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “मला तुम्हाला फोटोग्राफर बनवायचे आहे… ही माझी इच्छा आहे.” तर, दुसर्याने लिहिले, “तुम्ही नेहमी एकच ट्राउजर/पँट का घालता. तुमच्याकडे एकच ट्राउजर आहे का?” , तर एकजण म्हणाला, ‘तुला कपडे घालायला काय हरकत आहे.’ अशा प्रकारे चाहते अभिनेत्रीच्या फाेटाेवर वेगवेगळ्या कमेंट करून आपली प्रतीक्रिया मांडत आहेत.
उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली.(tv actress urfi javed topless and cover her front body with rose petal brutally trolled video goes viral on social media)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! साराचे प्रेमात पाडणारे फोटोशूट, एकदा पाहाच
‘द केरळ स्टोरी’वर कमल हसन यांच मोठ वक्तव्य; म्हणाले, ‘मी कोणत्याही चित्रपटावर…’