Thursday, June 13, 2024

‘द केरळ स्टोरी’वर कमल हसन यांच मोठ वक्तव्य; म्हणाले, ‘मी कोणत्याही चित्रपटावर…’

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहेत. त्यांना आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर अनेक दशके वर्चस्व गाजवले आहे. कमल हे चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्मान केले आहे. यादरम्यान एक वेगळ्याच कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. काय आहे हे कारण चला जाणून घेऊ.

‘द केरला स्टोरी’चा (The Kerala Story) वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. कमल यांनीही या चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “कोणीही अशा गोष्टीच्या संंख्येत आपण वरचढ करून सांगू शकत नाही. तसेच त्याला राष्टीय संकटांसारखे बनवू शकत नाही.” त्याचवेळी त्यांनी आद्यापही द केरला स्टोरी चित्रपट पाहिला नाही, पण लोकांकडून या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकल आहे, असेही सांगितले.

संधी मिळाली तर द केरला स्टोरी चित्रपटावर बंदी घालताल का? या प्रश्नाचे उत्तर देताना कमल म्हणाले की, मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालणार नाही. प्रेक्षकांनो आधी चित्रपट समजुन घ्या. त्यानंतर त्याचा उद्देश काय आहे हे समजून घ्या, असे सांगेल. त्याचवेळी त्यांनी तमिळनाडूमध्ये ‘विश्वरूपम’ चित्रपटावर बंदी का घालण्यात आली होती याबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

ते म्हणाले, राज कमल फिल्म आणि तामिळनाडू सरकार यांच्यात एक खटला होता, जो त्यांनी जिंकला आणि नंतर चित्रपट प्रदर्शित केला. त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आव्हान ही केले आहे. द केरळ स्टोरीबद्दल बाेलायचे झाले तर, या चित्रपटात अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. अशात या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचे प्रचंंड कौतुक होत आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. (Kamal Haasans big statement on ‘The Kerala Story’)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा
बिकिनी टाॅपसाेबत स्टाईलिश ब्लेजरमध्ये हिनाने दिल्या हटके पाेज, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा