बिग बॉस १७ मध्ये गाजलेल्या स्पर्धकांमधील एक स्पर्धक म्हणजे आयशा खान. (Ayesha khan) या शोमध्ये आयशा वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन लोकप्रिय झाली. आयशाने घरात येऊन ती मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचा खुलासा केला. इतकेच नव्हे तर मुनव्वर फारुकीच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले. त्यामुळे ती चांगलीच प्रकाशझोतात आली. आता तिला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिग बाॉसनंतर सर्वात लोकप्रिय शो म्हणजे खतरों के खिलाडी. सलमान खानच्या बिग बॉस शोनंतर खतरों के खिलाडी हा शो प्रेक्षकांचे सर्वात जास्त मनोरंजन करताना दिसतो. अशातच आयशा खानने नुकतेच ‘खतरों के खिलाडी सीझन 14’ बाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या शोमध्ये आता आयशा खान भाग घेणार असल्याचे बोलले जात आहे.
नुकतचं आयशा खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिनं खतरों के खिलाडी या शोचा उल्लेख केला आहे. तिनं पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खतरों के खिलाडी शोमध्ये भाग घेणार आहेस का? असे विचारले असता. ‘तुम्ही पाहिले असाल की मी बिग बॉसच्या घरात कधी पडत होते आणि इथे धोक्यांशी खेळण्याचा प्रश्न आहे. खऱ्या जीवनात मी खूप धोक्यांशी खेळली आहे. पण, मला जर संधी मिळाली तर मी नक्की भाग घेणार. कारण काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे माझ्याकडून काही बोलणं योग्य ठरणार नाही.’ अस आयशा म्हणाली. तिच्या या वक्तव्यामुळं खतरों के खिलाडी शोमध्ये भाग घेण्यास आयशा उत्सुक असल्याचे समजते.
तसेच तिला या व्हिडीओमध्ये में बिग बॉस 17 विनर मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांची नावंदेखील खतरों के खिलाडीसाठी चर्चेत आहेत. यावर मत विचारले असता आयशा म्हणाली, हे सर्वजण माझा एक मित्रपरिवार आहेत. चांगली गोष्ट आहे की त्यांची नावं या शोसाठी चर्चेत आहेत. यासर्वांना आणखी एका शोमध्ये पाहण्यास मी उत्सुक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्का दुसऱ्या बाळाला भारतात नव्हे तर ‘या’ ठिकाणी देणार जन्म, वाचा सविस्तर
एल्विश यादवच्या अडचणीत वाढ; FSL रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर