Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

वाईल्ड कार्ड एंट्री सोनाली फोगाटने आल्या आल्या घरातल्यांशी घेतला पंगा! रुबिनाला केली शिवीगाळ!

बिग बॉसचं घर हे सदानकदा वादातच सापडलेलं असतं. जेव्हा बघावं तेव्हा या घरात फक्त वादच पाहायला मिळत असतात. मध्ये कधी वेळ मिळाला तर या घरात छोट्या मोठ्या प्रेमकथाही फुलू लागतात. पण दिवसाच्या शेवटी पुन्हा कुठलं तरी नवं भांडणच आपल्याला पाहायला मिळतं. सध्या बिग बॉसच्या १४ व्या पर्वात आपल्याला हेच सगळं जास्त पाहायला मिळत आहे. पुन्हा या घरात नेक्स्ट लेव्हलची भांडण आणि शिवीगाळ झालेली पाहायला मिळाली. कोण आणि कसं यात सहभागी होतं चला एकदा पाहुयात.

सोनाली फोगाट अलीकडेच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉस १४ च्या घरात दाखल झाली आहे आणि सुरुवातीपासूनच तिची घरातल्यांशी भांडण होत आहेत. सोनाली फोगाट राखी सावंत ते निक्की तांबोळीपर्यंत सर्वांना भिडली आहे आणि तिने घरातील सदस्यांबरोबर अजूनही हीच वृत्ती सुरू ठेवली आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा सोनाली फोगाटने घरात बरीच वादावादी केली आणि यावेळी तिच्या नजरेत होती रुबीना दिलाईक! सोनाली फोगाट आणि रुबीना दिलाईक यांच्यात सुरू झालेली वादावादी इतक्या टोकापर्यंत पोहोचली की सोनाली फोगाटने रागात रुबीनाला शिवीगाळ केली.

अखेर आता रुबीना दिलाईकच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आता सोनाली फोगाटही आली आहे. आता बर्‍याच लोकांनी सोनाली फोगाटला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करण्यास सुरवात केली आहे. रुबीना दिलाईकला अपशब्द वापरल्याबद्दल तिचे चाहते सोनाली फोगाटवर खूप रगावलेले दिसत आहेत. मात्र, हे सर्व ऐकल्यानंतर रुबीनाही शांत राहिली नाही आणि तिने सोनाली फोगाटला खरं खोटं सुनावलं. रुबीना आणि सोनाली यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अर्थात रुबीना आणि सोनाली यांच्यातील ही काही पहिलीच चिडचिड नाही. यापूर्वीही या दोघींमध्ये भांडणं झाली आहेत. चॅनलद्वारे शेअर केलेल्या प्रोमोमध्येही रुबीना आणि सोनाली फोगाट यांच्यातील भांडणाची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या चाहत्यांनाही रुबीनासोबतचं सोनाली फोगाटचं हे वागणं आवडलेलं नाही. सोनाली फोगाटच्या या कृतीमुळे बिग बॉस या शोचे चाहते खूप नाराज असल्याचं पाहायला मिळतंय.

हे देखील वाचा