Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ गोष्टीमुळे खूप चिंतेत पडला उमर रियाझ, देश सोडून जाण्याचाही केला होता त्याने विचार

उमर रियाझ (Umar Riaz) ‘बिग बॉस १५’ मधून दोन आठवड्यांपूर्वी बाहेर पडला होता. प्रतीक सहजपालसोबत (Pratik Sehajpal) हिंसाचार केल्याबद्दल त्याला जनतेने बाहेरचा रस्ता दाखवला होता. उमर बाद झाल्याने तो नाराज झाला आहे. हे अन्यायकारक असल्याचे त्याने म्हटले होते. उमर हा व्यवसायाने डॉक्टर आहे आणि ‘बिग बॉस १३’ चा स्पर्धक असीम रियाझचा (Asim Riaz) भाऊ आहे. या शोमध्ये उमरच्या प्रोफेशनवर अनेक वेळा भाष्य करण्यात आले. त्याचा हिंसक आणि आक्रमक स्वभाव पाहून सलमान खाननेही त्याला सल्ला दिला होता.

शोनंतर एका मुलाखतीत उमरने त्याच्या शोमधून बाहेर पडण्याच्या गोष्टीला अनुचित म्हटले आहे. त्याला कमी मते मिळाली नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. उमर पुढे म्हणाला की, त्याच्या व्यवसायाला सतत लक्ष्य केले जात होते आणि त्याने हे देखील उघड केले की, त्याचा त्याच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे आणि तो जम्मू किंवा दुबईला जाण्याचा विचार करत आहे.

उमर म्हणाला की, “जेव्हा मी आत होतो आणि माझ्या व्यवसायाला लक्ष्य केले गेले. तेव्हा मला वाटले की, मी मुंबईत डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकणार नाही आणि मला देशाबाहेर जावे लागेल. पण जेव्हा मी बाहेर आलो आणि प्रेक्षकांना पाहिले तेव्हा मला वेगळी प्रतिक्रिया दिसली.” उमर म्हणाला की, “जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा भावना खूप जास्त असते आणि काहीतरी चूक करू शकते. पण यामध्ये माझे प्रोफेशन ओढले गेले.”

जम्मू किंवा दुबईला जाण्याचा करतोय विचार
उमर पुढे म्हणाला की, “लोक म्हणाले की, मी असा वागलो तर मी कसा डॉक्टर आहे. आपण असे म्हणू शकत नाही की, वास्तविक जीवनात राग येईल. मला सांगण्यात आले की, मी बाहेर काम करू शकत नाही. मी पण स्वतःला प्रश्न करू लागलो. मी जम्मू किंवा दुबईला शिफ्ट व्हावे असा विचार मी घरातच करू लागलो होतो. मला मुंबईत प्रॅक्टिस करू दिली जाणार नाही.”

उमर रियाझ आक्रमक आणि हिंसक
उमर रियाझ पुढे म्हणाला की, “जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मी खरोखरच हे सर्व विचार करत होतो. परंतु जेव्हा मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहिली तेव्हा ते पूर्णपणे वेगळे होते. त्याचा माझ्यावर खूप मानसिक परिणाम झाला. या कमेंट्समुळे मला खरोखर खात्री पटली की, मी आक्रमक आणि हिंसक आहे आणि आता डॉक्टर म्हणून माझ्या व्यवसायावर परिणाम होईल आणि माझी १० वर्षांची मेहनत पाण्यात जाईल.”

खरंतर उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांच्यात खूप भांडण झाले होते. यादरम्यान उमरने प्रतीकला धक्काबुक्की केली. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला बाहेर काढण्याची मागणी होऊ लागली आणि जनतेने बाहेरचा रस्ता दाखवला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा