छाेट्या पडद्यावरिल लाेकप्रिय शाे ‘बिग बॉसचा 16‘ रंजक बनवण्यासाठी शोचे निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शोमध्ये रोज नवनवे ट्विस्ट आणि ड्रामा निर्माण होत आहे. सेलेब्स देखील घरात राहून चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये अब्दु राजिक, सौंदर्या शर्मा आणि प्रियांका चहर चौधरी यांसारख्या सेलिब्रिटींना प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जात आहे. सोशल मीडियावरही या सेलिब्रिटींचा बोलबाला आहे. तर, काही स्पर्धक प्रेक्षकांना इरिटेट करत आहेत. गेल्या आठवड्यात या यादीत शालीन भानोत याचे नाव सामील झाले होते.
बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शालीन (shalin bhanot) याने चिकन न मिळाल्याने संपूर्ण घर डोक्यावर घेतले आणि दिवसभर चिकन-चिकन करताना दिसला. इतकेच नाही तर शालीनने चिकनच्या नादात रागाच्या भरात बिग बॉसशी वाद घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र, बिग बॉसने शालीन चांगलेच फटकारले. आता वीकेंड का वार याै एपिसोडमध्ये, शोचा होस्ट सलमान खाननेही शालीनला फटकारले आणि जोरदार क्लास घेतला.
View this post on Instagram
बिग बॉस 16 च्या निर्मात्यांनी शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान शालीन भानोटला चिकन-चिकन करून सर्वांना त्रास देण्यासाठी फटकारत आहे. सलमान नाराजी व्यक्त करत म्हणतो, “ तूझ चिकन चिकन चिकन इतक झालं आहे की, टास्क सुरू होण्याआधी, रात्री झोपण्यापूर्वी. बिग बॉस तुम्ही पाठवतच का आहे यार, मी तर हे सांगेल की तुम्ही तेही बंद करा. एकतर तुम्ही बाहेर डिस्टर्ब कराल, मग आत तुम्ही बिग बॉसला इरिटेट कराल.”
View this post on Instagram
शालीन भानोतला अशा प्रकारे फटकारल्यामुळे शोचे प्रेक्षक खूपच आनंदी झाले कारण त्यांनाही शालीनचे चिकन-चिकन आवडत नव्हते. प्रोमोवर कमेंट करताना, एका युजर्सने म्हटले की, “त्यांने बिग बॉसच्या घरात नाही तर चिकन फार्मला जायला पाहिजे होते.”
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! सर्वांसमाेर रणवीरने दीपिकाला केले किस; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना केले आश्चर्यचकित, अभिनेत्याने शेअर केला मजेदार व्हिडिओ