Friday, January 3, 2025
Home टेलिव्हिजन एक चुक नडली! ‘या’ टिव्ही कलाकारांना निर्मात्यांनी चालू मालिकेतून दाखवला होता थेट बाहेरचा रस्ता

एक चुक नडली! ‘या’ टिव्ही कलाकारांना निर्मात्यांनी चालू मालिकेतून दाखवला होता थेट बाहेरचा रस्ता

छोट्या पडद्यावरील मालिका आणि त्यामधील कलाकारांचे प्रेक्षकांशी घट्ट नाते तयार झालेले असते. मालिकेच्या प्रेक्षकांचे या कलाकारांशी इतके घट्ट नाते तयार झालेले असते की या कलाकारांशिवाय त्या मालिकेची लोकप्रियता घटते. त्यामुळेच मालिकेतील कलाकारांना एक कार्यक्रम सुरू असताना दुसरा कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जात नाही. परंतु मनोरंजन जगतात असेही काही कलाकार आहेत जे ज्यांना त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

पारस कालनावट-  टीव्ही अभिनेता पारस कालनावट सध्या चर्चेत आहे. अनुपमा या मालिकेत समरची भूमिका साकारणारा पारसला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. याचे कारण पारसने निर्मात्यांना न सांगता रिअलिटी शो झलक दिखला जा साइन केले. याबाबत पारस कालनावत सतत बोलत असतो.  त्याचवेळी तो राजकारणाचा बळी झाल्याचे सांगत आहे.

जिया मानेक – टीव्ही सीरियल साथ निभाना साथियामध्ये गोपी बहूची भूमिका साकारणारी अभिनेत्री जिया मानेक हिला निर्मात्यांनी रातोरात शोमधून बाहेर काढले. झलक दिखला जामध्ये जिया सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे निर्मात्यांनी तिच्यासोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर जिया कोणत्याही शोमध्ये दिसली नाही.

शिल्पा शिंदे – ‘भाबीजी घर पर हैं’ ची अंगूरी भाभी पूर्वी अभिनेत्री शिल्पा शिंदे होती. निर्माते तिचा छळ करत असल्याचे सांगत शिल्पाने शो सोडला. दुसरीकडे, निर्मात्यांनी तिच्यावर करार मोडल्याचा आरोप केला. हे प्रकरण वाढल्यानंतर शिल्पावर टीव्ही इंडस्ट्रीतून बंदी घालण्यात आली होती.

सोनारिका भदौरिया- सोनारिकाने देवों के देव महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. पेमेंटच्या समस्येमुळे तिला जबरदस्तीने शोमधून बाहेर फेकण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सोनारिकाने कागदपत्रे पूर्ण केली तेव्हा निर्मात्यांनी तिची फी वाढवण्याचे आश्वासन दिले. तथापि, नंतर तिला एक पत्र मिळाले, ज्यामध्ये ही गोष्ट नाकारण्यात आली. यानंतर सोनारिकाकडे शो सोडण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.

अंकिता लोखंडे- ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या अंकिता लोखंडेने कॉमेडी सर्कसमध्ये काम केले होते. रिपोर्ट्सनुसार, या शोचे निर्माते अंकितावर खूप नाराज होते. ती शूटसाठी उशीरा यायची आणि तिथे जास्त वेळ घालवायची नाही. कपिल शर्मालाही अंकिताची वागणूक आवडली नाही, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत तिला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर अंकिताला परत यायला बराच वेळ लागला.

हेही वाचा –

दिशा पटानीचा बिचवर मस्ती करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल, बोल्ड, बिंधास्त अदांवर झाले चाहते घायाळ

‘लग्नानंतर पतीवर अवलंबून राहणे चुकीचे की बरोबर?’, चाहत्याच्या प्रश्नावर काय म्हणाली विद्या बालन?

‘भाईजान’च्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा, मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात दिसला सलमान

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा