Wednesday, July 3, 2024

‘आधा इश्क’ फेम आमना शरीफने बॉलिवूडमधील भेदभावाविषयी केले खुलासे, मानसिकता बदलण्याचा दिला सल्ला

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे बॉलिवूडमध्ये जाण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न ते पूर्ण देखील करतात. परंतु टेलिव्हिजन पार्श्वभूमीमुळे त्यांना भेदभावाचा सामना करावा लागतो. हिना खानसह (Hina Khan) अनेक टीव्ही अभिनेत्रींनी याबद्दल खुलासे केले आहेत. अशातच आता अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल बोलली आहे.

अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत कसा भेदभाव केला जातो आणि तसे झाले नसते, तर तिला चांगल्या ऑफर्स मिळू शकल्या असत्या. अभिनेत्री म्हणाली, “मी याचा सामना केला आणि अजूनही करते. मला वाटतं ‘आलू चाट’ आणि ‘एक व्हिलन’ केल्यानंतर मला आणखी चांगल्या ऑफर्स मिळू शकल्या असत्या. गोष्टी बदलल्या असतील, पण तरीही मला भेदभावाचा सामना करावा लागतो.” (tv industry aamna sharif facing discrimination in bollywood)

आमना शरीफने बॉलिवूडला दिला विचार बदलण्याचा सल्ला
आमनाने याच मुलाखतीत सांगितले की, तिने एका प्रोजेक्टसाठी ऑडिशन दिले होते आणि लुक टेस्ट करूनही तिला तो प्रोजेक्ट मिळाला नाही. अभिनेत्री म्हणाली, “मी मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन आणि लुक टेस्ट दिली आणि निर्मात्यांनाही ती आवडली. पण मी टीव्ही पार्श्वभूमीची आहे त्यामुळे ही प्रक्रिया पुढे गेली नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. विचार बदलण्याची गरज आहे, असे मला वाटते. लोकांनी एखाद्या अभिनेत्याला अभिनेता म्हणून स्वीकारले पाहिजे, त्याच्या पार्श्वभूमीवरून नाही.”

 

आमना शरीफ टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘कहीं तो होगा’मधून तिला प्रसिद्धी मिळाली. ‘आलू चाट’ आणि ‘एक व्हिलन’ व्यतिरिक्त आता अभिनेत्रीने ओटीटीवर पाऊल ठेवले आहे. वूटवरील तिची वेब सिरीज ‘आधा इश्क’ चाहत्यांना खूप आवडते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा