हॉटनेसचा कहर! आमना शरीफने समुद्र किनारी केले फोटोशूट, पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका


‘कही तो होगा’, ‘होंगे जुदा न हम’, ‘एक थी नायिका’ आणि ‘कसोटी जिंदगी की २’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे आमना शरीफ होय. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, हे फोटो तिने समुद्रकिनारी बिकिनी घालून काढले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

आमना शरीफने हे फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. समुद्रकिनारी तसेच समुद्रात जाऊन पाण्यात तिने फोटो काढले आहेत. एका फोटोत सनग्लासेस घातलेले दिसत आहेत. तिचे हे ग्लॅमरस फोटो सगळ्यांना खूप आवडले आहेत. तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. (actress aamana sharif share her bikini photos on social media)

या आधी तिने दुबईमधील काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची ब्रालेट, बिकिनी आणि काळ्या रंगाचा चष्मा लावला होता. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. तसेच अनेकांनी या फोटोमुळे तिला ट्रोल देखील केले होते.

तिने आता शेअर केलेल्या फोटोवर ४७ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. तसेच अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. आमना शरीफने नुकतेच ‘डॅमेज ३’ या वेबसीरिजमधून डिजिटल डेब्यू केला आहे. यामधील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासोबतच सोशल मीडिया पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच खूप आवडतो. सोशल मीडियावर तिचे १.९ मिलियन एवढे फॉलोव्हर्स आहेत. त्यामुळे तिने कोणताही फोटो शेअर केला की, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

-सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

-अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा


Latest Post

error: Content is protected !!