‘रमजानमध्ये तरी पूर्ण कपडे घाल’, अभिनेत्री आमना शरीफने शेअर केलेल्या फोटोंवर भडकले नेटकरी


छोट्या पडद्यावरील सुंदर चेहरा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपले वेगवेगळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. चाहते तिच्या लूकचे नेहमी कौतुक करतात, पण अलीकडेच आमनाने असे काही फोटो शेअर केले आहेत की, तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. रमजान महिन्यात आपले आकर्षक फोटो शेअर केल्याबद्दल चाहते चांगलेच भडकले आहेत.

या फोटोमध्ये आमना क्रोशिया वकरसह पट्टीदार शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली आहे. तिने गळ्यात सोन्याची चेन परिधान केली आहे, आणि खूपच मेकअप केला आहे. तिच्या या आकर्षक अंदाजाला काही चाहत्यांनी पसंती दर्शविली, तर काहींना रमजानच्या महिन्यात आमनाच्या या लूकमुळे खूप राग आला होता.

आता हे फोटो पाहून चाहते तिला प्रश्न विचारत आहेत की, ‘तू खरोखर मुस्लिम आहेस काय?’ एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘रमजानच्या महिन्यात तरी ३० दिवस पूर्ण कपडे घाल.’ त्याचबरोबर दुसर्‍याने लिहिले आहे की, ‘रोजा रमजानमध्ये अशी पोस्ट टाकू नका.’ एकाने लिहिले आहे की, ‘तुम्ही खरोखर मुस्लिम आहात का, जे रमजानात असे  फोटो शेअर करत आहे.’

‘कही तो होगा’ फेम आमना शरीफ आता डिजिटल जगात आपले पाऊल ठेवणार आहे. ‘डॅमेज्ड ३’ या आगामी मालिकेत ती डिजिटल डेब्यू करणार आहे. या वेब सीरिजचे पहिले दोन सिझन बर्‍यापैकी हिट ठरले होते, त्यात अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती, आणि आता तिचा तिसरा सिझन आमना शरीफला देण्यात आला आहे.

टीव्ही जगात, ‘कही तो होगा’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ हिट मालिका करणारी, आणि बॉलिवूडमध्ये ६ सिनेमे करणारी आमनाची ही पहिली ओटीटी मालिका आहे. ज्यामध्ये ती वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

-कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग


Leave A Reply

Your email address will not be published.