Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड शमिता शेट्टी राकेश बापटला करतेय डेट? हातात हात घेऊन फिरताना दिसले दोघे

शमिता शेट्टी राकेश बापटला करतेय डेट? हातात हात घेऊन फिरताना दिसले दोघे

‘बिग बॉस ओटीटी’ची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे शमिता शेट्टी आणि राकेश बापट होय. या शो दरम्यान राकेश आणि शमिताची चर्चा सर्वत्र सूरु होती. या दोघांमधील छोटे-मोठे किस्से ऐकायला चाहत्यांना खूप आवडतात. शो दरम्यान राकेशने खुलासा केला होता की, त्याला शमिता खूप आवडते. तसेच शमितानेही राकेशवरचे प्रेम व्यक्त केले होते. त्यामुळे चाहत्यांना असे वाटले की, त्यांच्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलिकडचे नाते तयार होत आहे. शो संपल्यावर राकेशने शमिताला भेटण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र फिरतानाचा दिसत आहेत.

अलिकडेच, फोटोग्राफर व्हायरल भयानीने इंस्टाग्राम अकांऊटवरुन शमिता आणि राकेशचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राकेश आणि शमिता एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले आहेत. दोघांना एकत्र पाहून दोघांच्याही चाहत्यांनी वेगळाच अंदाज बांधला आहे. चाहत्यांना वाटते की, ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या व्हिडिओमध्ये राकेशने काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर शमिताने क्रिम रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस परिधान केला आहे.

राकेश आणि शमिता ‘बिग बॉस’च्या घरात नेहमीच एकमेकांना साथ देत राहिले. या दरम्यान, शमिता आणि राकेशमधील जवळीकता वाढली. शमिताने राकेशसाठी ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांसमोर तिच्या आईने दिलेले पत्र फाडले. त्यामुळे सर्वांच्या मनात राकेश आणि शमिताविषयी वेगवेगळे विचार येण्यास सुरूवात झाली. पण ‘बिग बॉस’ची विजेती दिव्या अग्रवालमुळे राकेश आणि शमितामध्ये बाचाबाची झाली व्हायची.

या शो दरम्यान, शिल्पाने शमिताला सपोर्ट करत कित्येक पोस्ट शेअर केल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी शिल्पाने फिनालेच्या आधी शमिताचा एक व्हिडिओ शेअर केला होता. शामिताविषयी बोलायचे झाले, तर अक्षरा आणि दिव्याशी झालेल्या वादामुळे ती चर्चेत राहिली. तसेच राकेशसोबतच्या केमिस्ट्रीमुळेही मनोरंजन विश्वात तिच्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा