Thursday, April 25, 2024

अरर! दिवाळीपूर्वीच संपुष्टात आला ‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकाचा प्रवास; तुम्हाला माहिती आहे का?

छोट्या पडद्यावर असे अनेक शो आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. यापैकीच एक म्हणजे ‘बिग बॉस’ होय. बिग बॉसच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, आतापर्यंत या शोचे १४ पर्व संपन्न झाले आहेत. सध्या या शोचे १५ वे पर्व सुरू आहे. यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. मात्र, यापैकी काही स्पर्धकांना दिवाळीपूर्वीच घरातून बाहेर पडावे लागले. मागील आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमधून अकासा सिंग घरातून बाहेर पडली आहे.

मागील आठवड्यात घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांमध्ये अकासा सिंगव्यतिरिक्त सिंबा नागपाल आणि विशाल कोटियन हे नॉमिनेटेड होते. प्रेक्षकांकडून कमी मतं मिळाल्याने अकासाला घरातून बाहेर पडावे लागले आहे. (TV Show Bigg Boss 15 This Contestant’s Journey Ended In The Show Before Diwali)

या आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमध्ये रॅपर बादशाह खास पाहुणे म्हणून एन्ट्री करताना दिसला. शेवटच्या एपिसोडमध्ये रोहित शेट्टी आणि बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. बादशाहच्या एन्ट्रीनंतर होस्ट सलमान खान त्याच्यासोबत मस्ती करताना दिसला.

दोघेही नाचताना आणि संवाद साधताना दिसले. बादशाह सलमानला ‘हम आपके है कौन’ मधील डायलॉग बोलायला सांगतो आणि सलमान म्हणतो, “लोक म्हणतात सुंदर मुली खोटं बोलतात, तेव्हा जास्त सुंदर दिसतात.” ज्याला बादशाह उत्तर देतो, “सुंदर मुली खोटे का बोलतात?”

याशिवाय बादशाह स्पर्धकांना काही भेटवस्तू देखील देतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार वाद होतात. निशांत म्हणतो की, त्याला करणला आरसा द्यायचा आहे. कारण, त्याच्या मते त्याची खरी बाजू समोर येत आहे. करण म्हणतो की, त्याला त्याची पर्वा नाही. इतर स्पर्धकही एकमेकांना दोष देऊ लागतात आणि त्यांच्यात भांडणही सुरू होते.

विशेष म्हणजे, ‘बिग बॉस १५’मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’मधीलही काही स्पर्धकही सामील आहेत. त्यात निशांत भट्ट आणि प्रतीक सेहजपाल यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर

-जान कुमार सानू सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्यूट? नवीन गाण्याची घोषणा करताच ट्रोलर्सने साधला निशाणा

-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल

हे देखील वाचा