Tuesday, June 18, 2024

बाबाे! राखीच्या चेहऱ्यावर भळभळती जखम पाहून चाहत्यांना बसला धक्का; युजर्स म्हणाले, ‘कोणी मारले…’

राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने पती आदिल दुर्रानीवर मारहाणीसह अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण आता इतके वाढले आहे की, आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रामा क्वीनचा नवरा तुरुंगात आहे, तर राखी कामावर परतली आहे. दरम्यान, आता राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन जखमी दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

खरे तर, राखी सावंत (rakhi sawant) कामावर परतली आहे. व्हिडिओमध्ये, ती व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरताना दिसत असून मीडिया मॅनसाेबत बाेलत आहे. ती सांगत आहे की, “आज तिचा मारहाणीचा सीन आहे.” त्यानंतर ती तिच्या मेकअप मॅनला सांगते, “असे मेकअप करा की, मला मारहाण झाली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत हिचा नवीन ड्रामा पाहून चाहते स्तब्ध आहेत. बर्‍याच लोकांनी यावर भिन्नभिन्न कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तिचे तोंड आधीच तुटलेले आहे.’, तर एकाने कमेंट करत लिहिले की, ‘हे मीडियाशिवाय जगू शकत नाही.’ अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘या छपरीला काेण काम देते.’

राखी सावंत बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती बिग बॉस शोमध्येही दिसली हाेती. तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये छाेट्या-माेठ्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांमध्ये चांगलीच पसंती मिळते. राखी सावंत तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी माेठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तिला ‘ड्रामाक्विन’ म्हणूनही ओळखले जाते.(tv actress rakhi sawant makeup face has bruises marks in viral video fans question who beat you see reaction)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी एक-दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला…,’ उर्फिचा धक्कादायक खुलासा

राज कपूरसाेबतच्या अफेअरवर झीनत अमानने ताेडले माैन; म्हणाल्या, ‘देव आनंदला असं वाटलं…’

हे देखील वाचा