अभिनेता आणि होस्ट शेखर सुमन या वीकेंड का वारमध्ये बिग बॉसमध्ये दिसणार आहे. शेखरने यावेळी प्रियांका चौधरी आणि एमसी स्टेन यांच्यावर एक रॅप गाणेही तयार केले आहे. हे ऐकून घरातील सदस्य हसून हसून लाेटपाेट झाले आहेत. या रॅप ला बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबतच चाहत्यांकडूनही भरभरून दाद मिळत आहे.
कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे या वीकेंड का वारचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शेखर सुमन (shekhar suman ) ब्लॅक लूकमध्ये दिसत असून त्याने सूट आणि टाऊजर परिधान केला आहे. या स्टायलिश लूकमध्ये शेखरने रेड कार्पेटवर प्रवेश केला आहे. यानंतर शेखरने सर्व स्पर्धकांना फ्लाइंग किस देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
शेखरच्या आजूबाजूला बरेच फाेटाेग्राफर दिसत आहेत जे त्याला सर…सर…सर म्हणत आहेत. यावर शेखर म्हणताे, ‘एकावेळी एकच प्रश्न’. हे पाहून घरातील सदस्य हसताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पुढे, एक व्यक्ती शेखरला विचारते, ‘एमसी आणि प्रियांका बाहेर म्युझिक व्हिडिओमध्ये दिसतील का?’ यावर शेखर रॅप गाऊन उत्तर देतो आणि म्हणताे, ‘बेजान सा लौंडा में, लडकी तू चालक लोमडी.’ हे रॅप ऐकून एमसी स्टॅन आणि प्रियांका हसताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या प्रोमोवर शोच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘प्रियांका आणि स्टॅनची स्पर्धाही छान आहे’. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘पहिल्या दिवसापासून शिव, स्टेन आणि प्रियांका एकत्र असते, तर काय मजा आली असती’. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘प्रियांका दिवसेंदिवस सुंदर दिसत आहे.’
‘बिग बॉस 16’ चा फिनाले 12 फेब्रुवारीला हाेणार आहे. या फाइनल राउंडमध्ये अर्चना गौतम, निमृत कौर अहलुवालिया, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, शालिन भानोत आणि शिव ठाकरे ट्रॉफीसाठी लढताना दिसणार आहेत.( tv show bigg boss 16 shekhar suman made a rap on priyanka chaudhary and mc stan the contestant were shocked)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शिवानी सुर्वेचा हाॅट अंदाज चाहत्यांना लावताेय याड, एक नजर टाकाच
सिनेजगतातील दिग्गज पत्रकाराचे निधन, दीर्घकाळापासून आजाराने हाेते त्रस्त