‘केबीसी’च्या मंचावरच बबितासोबत रोमँटिक झाले जेठालाल, पण मध्येच अमिताभ बच्चन यांनी घातला खोडा


छोट्या पडद्यावर असे काही शो आहेत, जे नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. यामध्ये समावेश होतो, तो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध रियॅलिटी शोचा. या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण यावरून लावू शकतो की, या शोचे सध्या १३ वे पर्व सुरू आहे. या पर्वातही दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट म्हणजेच सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. नेहमीच या शोमधील शुक्रवार मजेशर असतो. आता यावेळी अशीच काहीशी मजा येणार असल्याचे दिसत आहे. कारण, या शोमध्ये यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. दरम्यान, या शोमधील जेठालालचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, जेठालाल ‘केबीसी’च्या मंचावरच बबिता जीसोबत रोमँटिक होतात. मात्र, यावेळीच अमिताभ त्यांना मध्येच रोखतात.

तब्बल २१ लोकांनी लावली ‘केबीसी’मध्ये हजेरी
अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १३’वर नेहमीच कलाकार पाहुणे म्हणून हजेरी लावतात. यावेळी ‘केबीसी’च्या मंचावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ची संपूर्ण फौजच पोहोचली आहे. तसेच, त्यांना बसवण्यासाठी जागाही मिळत नाहीये.

बसवण्यासाठी कमी पडली जागा
शानदार शुक्रवारच्या या एपिसोडमध्ये गोकुलधामचे रहिवासी म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सर्वांनीच हजेरी लावली. या सर्वांना पाहून खुद्द अमिताभही हैराण झाल्याचे दिसत आहेत. तसेच ते म्हणत आहेत की, “तुम्ही २१ जण आहात?” यानंतर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी म्हणतात की, “काय करणार २ तर इथेच बसतील. बाकीचे खाली पंगत घालून बसतील.” यावर अमिताभ म्हणतात की, “हे देवा.”

अनेक व्हिडिओ झालेत व्हायरल
आणखी एका व्हिडिओत जेठालाल अमिताभ बच्चन यांना विचारतात की, ते अजूनही अभिषेक बच्चनला फटकारतात का? यावर अमिताभ त्यांच्याकडे टक लावून प्रतिक्रिया देताना दिसतात. या शोचा प्रोमो व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोपटलाल पुन्हा एकदा अमिताभ यांच्या लग्नाबद्दल नाराज होताना दिसत आहेत. सोबतच ते पीठ मळणे, झाडू मारणे असे सर्व काही त्यांना माहिती असल्याचे बोलून दाखवत आहेत. अमिताभ त्यांची स्तुती करताना म्हणतात की, “शाब्बास.”

या शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकारही गरबा करताना दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होत आहे की, हा आगामी भाग खूप मनोरंजक असणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!