सलमान खान बॉलिवूड सुपरस्टार आहे तसेच तो एक उत्तम माणुस देखील आहे. सध्या आसाममध्ये पुर आला आहे. आणि तिथील लोकांच्या मदतीसाठी तो पुढे आला आहे. त्याने ‘आशियाना – होप बिगिन्स विथ अ सेफ शेल्टर’ या मोहिमेत सामील होऊन त्याने मदतीचा पुढे केला आहे. पुरामध्ये ज्यांनी आपली घरे गमावली आहेत. त्यांना सुरक्षित घरे उपलब्ध करुन देणे हे या मोहीमेचे उद्दिष्ट आहे.
‘आशियाना – होप बिगिन्स विथ अ सेफ शेल्टर’ या मोहीमे अंतर्गत नेपाळी खुटी येथे बांधकाम सुरु झाले आहे. तर सध्या अंदाजे 220 अर्ध कायमस्वरुपी घरे झाले आहेत. यामळे अनेक बेघरांना राहण्यासाठी जागा मिळाली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट एकूण 500 घरे बांधणे आहे, ज्यामुळे शेकडो कुटुंबांना सुरक्षितता, आशा आणि सन्मानाने आपले जीवन पुन्हा उभारण्यास मदत होईल.
अभिनेता सलमान (salmaan) खानच्या पाठिंब्यामुळे या उत्तम कार्यामळे आता सर्वाचे लक्ष वेधले आहे. या कामा अजुन अनेकांना पूरग्रस्त समुदायांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळेल. तसेच सलमान खानची पूरग्रस्तांना मदत करण्याची पहिली वेळ नाही. त्याने या आधी अनेक जणांना मदतीचा हात दिला आहे.
सलमान खान व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड आणि स्थानिक कलाकारही आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. रणदीप हुडा याने अनेक जणाना तिथे जाउन जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले आहे.
हेही वाचा
प्रियांका चोप्रा दिसणार ‘ब्लूफ्लाय’ या सायन्स फिक्शन हॉलिवूड चित्रपटात, या दिवशी सुरू होणार शूटिंग










