‘खतरों के खिलाडी ११’मध्ये स्टंटदरम्यान निक्कीचा थरकाप; आरडाओरड पाहून रोहित शेट्टी म्हणाला, ‘ही निक्की तांबोळी नाही…’

TV Show Khatron Ke Khiladi 11 Contestent Nikki Tamboli Promo Out


टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘खतरों के खिलाडी ११’ चे चाहते हा शो सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या प्रोमोने चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री निक्की तांबोळी स्टंटदरम्यान चांगलीच घाबरलेली दिसत आहे. निक्कीला पाहून बाकी स्पर्धकांचा अगदी थरकाप उडाला आहे.

नुकतेच कलर्स टीव्हीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या शोचा प्रोमो शेअर केला आहे. या शोचा होस्ट रोहित शेट्टी आहे. प्रोमोच्या सुरुवातीला रोहित म्हणतो की, “ही निक्की तांबोळी नाही, चिखी तांबोळी आहे.” व्हिडिओमध्ये दिसते की, स्टंटदरम्यान निक्की पुरती घाबरलेली आहे. ती आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरजोरात ओरडते. निक्कीचे हावभाव पाहून अर्जुन बिजलानीसह इतर स्पर्धक खूपच घाबरतात. नक्कीच या हंगामात स्पर्धकांसमोर कठोर आव्हाने असणार आहेत.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी एका मगरीला कुशीत घेतलेली दिसत आहे. दुसऱ्या एका प्रोमोमध्ये अर्जुन बिजलानीला विजेचे झटके लागताना दिसत आहे. नक्कीच, यावेळीचा हंगाम स्पर्धकांमध्ये खूपच टक्कर पाहायला मिळणार आहे. शोमधील अंतिम तीन स्पर्धकांचे नावही समोर आले आहेत.

आपल्या ऍक्शन चित्रपटांनी प्रेक्षकांना थक्क करणारा रोहित शेट्टी या शोमध्येही आपल्या दमदार अंदाजाने लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शो ऑन एअर गेल्यानंतरच या हंगामाच्या विजेत्याबद्दल समजेल. खरं तर ‘खतरों के खिलाडी ११’ या शोचे प्रसारण जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कलर्स टीव्हीवर होणार आहे.

निक्की तांबोळीबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकतीच ‘बिग बॉस १४’मध्ये झळकली होती. यामध्ये ती द्वितीय रनरअप राहिली होती. तिने टीव्ही शोव्यतिरिक्त चित्रपटामध्येही काम केले आहे. निक्की सन २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंचना ३’मध्ये झळकली होती. यामध्ये राघव लॉरेन्स, देवदर्शिनी, तरुण आदर्श, सूरी यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.


Leave A Reply

Your email address will not be published.