Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

धक्कादायक! ‘खतरों के खिलाडी’ बनायला निघालेली अभिनेत्री उंचीवरून आपटली पाण्यात, रुग्णालयात करावे लागले दाखल

टीव्ही कलाकार हे मालिकांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त अनेक रियॅलिटी शोमध्येही सहभाग घेत असतात. या शोमध्ये त्यांना अनेकदा वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक टीव्ही रियॅलिटी शो आहे, ज्यामध्ये एक अभिनेत्री वाईटरीत्या दुखापतग्रस्त झाली आहे. तो शो म्हणजेच ‘खतरों के खिलाडी १२’ होय. या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री रुबीना दिलैक ही एका एपिसोडदरम्यान जखमी झाली. तिची तब्येत इतकी बिघडली की, तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच, तिला पूर्ण दिवस विश्रांती घेण्यासही सांगितले आहे. मात्र, शोदरम्यान हे घडले कसे त्याबद्दल जाणून घेऊया…

उंचीवरून खाली पडली रुबीना दिलैक
रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने एका एपिसोडमध्ये ग्रूप स्टंट करायला सांगितले होते. यावेळी त्याने सांगितले की, टास्कच्या आधारे तो प्रमुखाची निवड करेल. पहिला टास्क हा उंची आणि पाण्याचा होता. यामध्ये टीमचे प्रमुख निवडले जाणार होते. या कठीण टास्कदरम्यान रुबीना दिलैक (Rubina Dilaik) ही उंचीवरून पाण्यात पडली आणि तिला श्वास घेण्यात अडचण झाली. तिचे हात आणि पाय वाईटरीत्या जखमी झाले.

कनिकाला बसले वीजेचे झटके
मोहित आणि तुषार यांनी टास्क चांगल्याप्रकारे केला आणि ते टीमचे प्रमुख बनले. तुषारच्या टीमने फक्त ४ सदस्यांसोबत टास्क पूर्ण केला. दुसरीकडे, मोहितच्या टीममध्ये ५ सदस्य होते. यानंतर, टीमने प्राणी आणि वीजेचे टास्क केले. यामध्ये कनिकाने पुन्हा एकदा वीजेच्या झटक्यांचा सामना केला.

एपिसोडमध्ये पाहायला मिळाली भरपूर मजा-मस्ती
कनिका या टास्कदरम्यान खूपच रडू लागली आणि तिला हा टास्क करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फैजू, जन्नत आणि चेतना हा टास्क पूर्ण करण्यात यशस्वी झाल्या. या एपिसोडमध्ये खूप जास्त मजा-मस्ती पाहायला मिळाली. यामधील सर्वात मजेशीर टास्क हा ऍटोमेटेड रेडिओ स्पीकरचा होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
सचिवला सोडून ‘या’ व्यक्तीच्या गळ्यात पडली ‘पंचायत’मधील रिंकी, नेटकरी म्हणाले, ‘देख रहा है न बिनोद’
दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी सुखदुःखात साथ देत निभावली मैत्री, आजही होते चर्चा
केतकीची भन्नाट कलाकृती! शाईफेकीमुळे खराब झालेल्या ब्लाऊजवर केले सुंदर नक्षीकाम, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हे देखील वाचा