कलाविश्वातून एका पाठोपाठ एक अशा आनंदाच्या बातम्या येत आहेत. आधी अभिनेत्री बिपाशा बासू हिने तिची प्रेग्नंसी जाहीर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही दुसऱ्यांदा प्रेग्नंसी जाहीर केली आहे. ती अभिनेत्री इतर कुणी नसून रुचा हसबनीस ही आहे. रुचाने ही आनंदाची बातमी दिल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे, रुचा हिला पहिली मुलगी आहे.
‘साथ निभाना साथिया‘ (Saath Nibhana Saathiya) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुचा हसबनीस (Rucha Hasabnis) ही पुन्हा एकदा आई बनणार आहे. तिने पहिल्यांदा मुलीला जन्म दिला होता. आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे आणि तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक सुंदर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
रुचा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती एका कॅनव्हासवर ‘मोठी बहीण’ असे लिहिताना दिसत आहे. या फोटोला सुंदर कॅप्शन देत रुचाने लिहिले की, “प्रेण करण्यासाठी आणखी एकाचे आगमन.” तिच्या या पोस्टवर २० हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, ५००हून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
View this post on Instagram
तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच टीव्ही कलाकारही कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. ‘साथ निभाना साथिया’ फेम गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी हिने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. तसेच, मराठी अभिनेता भूषण प्रधान यानेही
“कायsss,” असे लिहीत स्माईल फेस विथ हार्ट आईज इमोजी वापरले आहेत. इतर कलाकारही तिला शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने ‘साथ निभाना साथिया’मधील तिचे पात्र म्हणजेच राशी या नावाचा वापर करत कमेंट केली. त्याने लिहिले आहे की, “अभिनंदन राशी.” आणखी एकाने लिहिले की, “आनंदाची बातमी, तुझं अभिनंदन, देव तुझं भलं करो.”
View this post on Instagram
लग्नानंतर छोट्या पडद्यापासून दूर आहे रुचा
अभिनेत्री रुचा ही सन २०१९ मध्ये पहिल्यांदा आई बनली होती. तिचे लग्न झाल्यापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. तिने सन २०१५मध्ये महाराष्ट्रीय रीतिरिवाजानुसार राहुल जगदाळे याच्यासोबत संसार थाटला होता. तिचा पती इंडस्ट्रीतील नाहीये. रुचा सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि मातृत्वाचा आनंद लुटत आहे. यासोबतच ती सोशल मीडियामार्फत चाहत्यांशी जोडली राहते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉयकॉटवर स्पष्टच बोलला विजय; म्हणाला, ‘फक्त आमिरच नाही, तर हजारो कुटुंब…’
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या २७ दिवसांपूर्वीच राजूने केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडिओ व्हायरल
लाईव्ह सुरू असतानाच आलियाच्या बेबी बंपवर रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, चाहते संतापले