Saturday, April 20, 2024

‘अरे बंद करा तो शो’, नवीन ‘तारक मेहता’ चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर केला बाजार

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये नवीन कलाकारांची एन्ट्री होत आहे. जुने ‘तारक मेहता’ म्हणजेच शैलेश लोढा यांनी शोला रामराम ठोकला आहे. अशातच सचिन श्रॉफ यांनी जुन्या ‘तारक मेहतां’ची जागा घेत शूटिंग सुरूदेखील केली आहे. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल झाला. यामध्ये ‘तारक मेहता’ बनलेले सचिन श्रॉफ यांची चाहत्यांना ओळख करून दिली आहे.

सचिन श्रॉफ बनले नवीन ‘तारक मेहता’
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्या जागी सचिन श्रॉफ (Sachin Shroff) यांना पाहणे आवडले नाहीये. ते पुन्हा एकदा जुन्या कलाकारांना शोमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत. संतापलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसदेखील पाडला आहे. यासोबतच शोच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे की, जर जुन्या कलाकारांना परत आणले नाही, तर ते शो बघणे बंद करतील.

असित मोदी ट्रोल
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “इतक्या वर्षांमध्ये जेवढी इज्जत कमावली होती, तेवढी सर्व बर्बाद केली आहे. आता तर आम्हीही शो बघणे बंद करणार आहोत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “कृपया हा शो बंद करा. कारण, आता याचे पुढील एपिसोड पाहणे आम्हाला आवडत नाहीये.”

शो बंद करण्याची विनंती
यावर्षी मार्च महिन्यापासून शैलेश लोढा यांनी शोची शूटिंग बंद केली होती. त्यानंतर असे वृत्त आले की, त्यांच्यात आणि निर्माते असित मोदी यांच्यात वाद झाले आहेत. शैलेश यांनी दुसरा शो साईन केला आहे, त्यामुळे त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला अलविदा केला आहे. त्यानंतर असित मोदी आणि शैलेश लोढा यांच्यात सोशल मीडियावर शीतयुद्ध सुरू झाले. दोघांनीही एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरू केले.

शैलेश लोढा यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टला लोकांनी असित मोदींशी जोडून पाहिले. त्यामध्ये लिहिले होते की, “तुम्ही अजून किती खालच्या थराला जाणार.” यापूर्वी असित मोदींनी म्हटले होते की, या लोकांचे पोट भरते, ज्या शोमुळे पैसा आणि यश मिळते, त्यालाच हे लोक विसरून जातात.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोबद्दल बोलायचं झालं, तर हा शो तब्बल 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोची सुरुवात 2008मध्ये झाली होती. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान बनवले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याने गुलाबाचे फूल देताच आर्यनने केले असे काही, चाहत्यांना दिसली शाहरुखची झलक
ऍडमिट होऊन 35 दिवस उलटले, तरीही राजू बेशुद्धच! भाऊ म्हणाला, ‘आता फक्त…’
‘ढाई किलो’चा हात दाखवत सनीने लावला निर्मात्याला चुना, 20 वर्षांनंतर अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप

हे देखील वाचा