Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ शुक्लावर आज करण्यात येईल अंतिमसंस्कार, ‘वर्ल्ड बेस्ट मॉडेल’ ओल्या डोळ्यांनी घेणार निरोप 

आयुष्यातील कोणता क्षण शेवटचा असेल हे कोणालाच माहीत नसतं. आठवड्यापूर्वी ज्या अभिनेत्याला प्रेक्षकांनी टीव्हीवर पाहिले, तो आता या जगात नाही. टीव्ही मालिका ‘बालिका वधू’द्वारे घरोघरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) निधन झाले. त्यावेळी तो ४० वर्षांचा होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा अचानक जग सोडून गेल्यानंतर, आई रीता शुक्ला बेशुद्ध पडल्या होत्या. सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन गुरुवारी संध्याकाळी कूपर रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर आज (३ सप्टेंबर) त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

११ वाजता कुटुंबियांना मिळणार मृतदेह
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याच्यावर गुरुवारी संध्याकाळपर्यंत अंतिमसंस्कार केले जातील, अशी माहिती पसरवली जात होती. परंतु शवविच्छेदन आणि पोलिस तपासात विलंब झाल्यामुळे हे शक्य होऊ शकले नाही. गुरुवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ४ तास करण्यात आले. ५ डॉक्टरांनी मिळून सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. सिद्धार्थचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

अंतिमसंस्कार करण्यापूर्वी ब्रह्माकुमारी येथे होईल पूजा
शुक्रवारी (३ सप्टेंबर) त्याचे पार्थिव प्रथम जुहू येथील ब्रह्माकुमारी कार्यालयात नेले जाईल. जिथे त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही पूजा-पाठ केले जातील. त्यानंतर तिथून त्याचा मृतदेह घरी नेला जाईल. त्याची आई रीता शुक्ला बऱ्याच काळापासून ब्रह्मा कुमारिस संस्थेशी संबंधित आहेत. याच कारणामुळे सिद्धार्थही ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडला गेला होता.

मुंबई पोलीस करतील अधिकृत निवेदन जारी
पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे मुंबई पोलीस आज अधिकृत निवेदन जारी करतील. आतापर्यंत पोलिसांकडून कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे हे स्टेटमेंट जारी करण्यात येईल. माध्यमातील वृत्तानुसार, सिद्धार्थ शुक्लाच्या शरीराची कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये अनेकवेळा बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, डॉक्टरांना त्याच्या शरीरावर कुठेही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. मुंबई पोलिसांनी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची आई, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला आहे.

कुटुंबाने ‘हे’ निवेदन केले जारी
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर, ते म्हणाले की,“आम्ही सर्वजण खूप दुःखात आहोत. आम्हाला तुमच्यासारखाच धक्का बसला आहे आणि आम्हाला सर्वांना माहित आहे की, सिद्धार्थ एक चांगला व्यक्ती होता. म्हणून कृपया त्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. तसेच प्रत्येकाने त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा आणि खोट्या बातम्या टाळा.”

अशी होती सिद्धार्थची शेवटची रात्र
मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला ३.३० वाजता अस्वस्थ वाटत होते. घरी आलेल्या डॉक्टरांनी सिद्धार्थला तात्काळ कूपर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर त्याची बहीण आणि मेहुणा सिद्धार्थला घेऊन घाईघाईने रुग्णालयात गेले . मात्र, वेळ निघून गेलेली होती. डॉक्टरांनी त्याला त्यावेळी मृत घोषित केले. सिद्धार्थच्या छातीत दुखत होते. त्याने रात्री त्याच्या आईला याबाबत माहिती दिली होती. आईला सांगितल्यानंतर सिद्धार्थ पाणी पिऊन झोपला आणि त्यानंतर पुन्हा उठलाच नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सिडनाझ’च्या नात्याबद्दल सिद्धार्थचा मित्र अबू मलिकने केला मोठा खुलासा, म्हणाला…

-पहाटेच्या ३ वाजता सिद्धार्थ शुक्ला झाला होता अस्वस्थ; आईला मागितले पाणी आणि म्हणाला…
-‘मी माझा मुलगा गमावला आहे’, सिद्धार्थच्या निधनावर प्रत्युषाच्या वडिलांनाही भावना अनावर

हे देखील वाचा