बिकिनीमधील लूकने वाढविला इंटरनेटचा पारा, उर्वशी ढोलकियाच्या घायाळ करणाऱ्या अदा!!


सोशल मीडियाच्या आजकाल जवळपास सर्वच कलाकार खूप अॅक्टिव्ह असतात. दिवसेंदिवस आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ते चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. काही अभिनेत्री आपले सुंदर आणि हॉट फोटो शेअर करून हेडलाईनचे कारण बनतात.

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आजकाल तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेचा विषय बनत आहे. तिचे नुकतेच समोर आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तिची बोल्ड स्टाईल चाहत्यांना पाहायला मिळत आहे. ती एकामागून एक नेहमी आपले बोल्ड फोटो शेअर करताना दिसत असते.

उर्वशी ढोलकियाने स्वत: चे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्वशी रंगीबेरंगी बिकिनीमध्ये दिसली आहे. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना वेड लावत आहेत. तसेच, उर्वशीच्या या बोल्ड फोटोला इन्स्टाग्रामवर खूपच पसंत केले जात आहेत.

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उर्वशी ढोलकिया स्विमिंग पूलजवळ पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर, चाहते फोटोवर कमेंट करून उर्वशीच्या सौंदर्याचे बरेच कौतुक करत आहेत. इंस्टाग्रामवर उर्वशीचे 10 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

उर्वशी ढोलकिया ही एक भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतुन तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेमध्ये ती कोमोलिका बासूच्या भूमिकेत चांगलीच गाजली. यानंतर, 2013 मध्ये उर्वशीने बिग बॉस 6 या टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला होता आणि यात ती विजेतीही ठरली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.