‘मदत करायचे नाटक करण्यापेक्षा…’, युजरने केली ट्विंकल अन् अक्षय कुमारवर टीका; अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

twinkle khanna reply to former officer who accused her and akshay kumar for not helping people


अभिनेत्री ट्विंकल खन्ना अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर देत असतात. तिची ही स्टाईल नेटकऱ्यांनाही पसंत पडते. नुकताच असाच एक किस्सा पुन्हा घडला आहे आणि अभिनेत्रीनेही त्यांना योग्य उत्तर दिले आहे.

अलीकडेच माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप यांनी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारवर टीका करत एक ट्वीट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “ट्विंकल जी, तुमचे पतीदेव देशातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. मग तुम्ही देणग्या जमा करून मदत करायचे नाटक करण्यापेक्षा, तुमच्या कुटुंबाने मन अधिक मोठे केले असते, तर बरे झाले असते. ही वेळ मदतीसाठी विचारण्याची नाही, तर मदत करण्याची आहे.”

त्यांना उत्तर देत ट्विंकलने लिहिले की, “आतापर्यंत आम्ही १०० कंसंट्रेटर्स दान केले आहेत. त्याशिवाय आणखी मदत करत आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे, ही बाब फक्त माझी किंवा तुमची आहे असे नाही, तर आपल्या सर्वांना एकत्रित लढावे लागेल. आपण मिळून सर्व गरजू लोकांना मदत केली पाहिजे. दुःखाची गोष्ट अशी आहे की, या वेळी जिथे मदत करायची वेळ आहे, तेथे काही लोक इतरांचे पाय खेचत आहेत. आपण सुरक्षित राहा.”

अक्षय कुमारही पडला होता कोव्हिडला बळी
काही दिवसांपूर्वी अक्षयही कोव्हिडला बळी पडला होता. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: ही माहिती दिली होती. जेव्हा अक्षय कोव्हिड पॉझिटिव्ह झाला, तेव्हा तो त्याच्या आगामी ‘राम सेतु’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहेत.

अभिनयापासून दूर आहे ट्विंकल खन्ना
ट्विंकल खन्नाबद्दल बोलायचे झाले, तर तिने बराच काळ झाला आपल्या अभिनय कारकीर्दीपासून मोठा ब्रेक घेतला आहे. लग्नानंतर तिने कोणतेही खास चित्रपट केले नाहीत. पण गेल्या काही वर्षांपासून ती सतत तिच्या कारकिर्दीला एक नवीन वळण देत आहे. आता तिने अभिनयापासून काही अंतर राखले आहे, पण जवळजवळ पाच वर्षे झाले ती आता लेखक बनली आहे. तिचे लेख बर्‍याच वर्तमानपत्रांत छापले जातात. ती तिचे मत अगदी निर्भीडतेने व्यक्त करते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.