नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या (Karan Johr) पार्टीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. चित्रपट निर्माता करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चित्रपट जगतातील कलाकार मोठ्या प्रमाणात जमले होते. करणची शालेय मैत्रीण ट्विंकल खन्नाही (Twinkle Khanna) पार्टीत सहभागी झाली होती, पण दुसऱ्या दिवशी हँगओव्हरने तिची तब्येत बिघडली. पार्टीनंतर तिच्या स्थितीचे वर्णन करताना, अभिनेत्रीने पार्टीमध्ये मोफत दारू, पार्टी, चमकदार स्कर्ट आणि करण जोहरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ट्विंकल खन्नाने करण जोहरच्या पार्टीनंतर तिचा हॅंगओव्हर काही उतरला नसल्याचे सांगत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. जो पाहून चाहतेही करण जोहरच्या करणच्या पार्टीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम पोस्ट असल्याचे सांगत आहेत. करण जोहरची पार्टी असेल तर ग्लॅमरसोबतच नाच-गाणेही असावे लागते. या पार्टीची बॉलिवूड कलाकारांनी चांगलीच मजा घेतलेली दिसत आहे, पार्टीत खाण्यापिण्याचीही भरपूर सोय झाली. रात्री उशिरा पार्टी केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ट्विंकल खन्ना इतकी दमली होती की ती ऑफिसमध्ये जांभई देताना दिसली. तिने हँगओव्हरबद्दल एक मजेदार व्हिडिओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवर शेअर केला.
व्हिडिओमध्ये, ट्विंकल पार्टीमधील तिचा फोटो दाखविला आहे, ज्यामध्ये तिने चमकदार चांदीचा स्कर्ट घातलेला दिसत आहे. यानंतर, तिला सकाळी ऑफिसमध्ये अंधुक दिसत आहे, जांभई येत आहे. व्हिडिओसोबत अनेक कॅप्शनही लिहिल्या आहेत, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, मला आशा आहे की मी चांगले करत आहे, कदाचित.. कदाचित नाही.. फ्री ड्रिंक्सवर बंदी घाला, पार्ट्यांवर बंदी घाला, चमकदार स्कर्टवर बंदी घाला, करणवर बंदी घाला असा मजेशीर कॅप्शन दिला आहे.हा व्हिडिओ शेअर करत ट्विंकल खन्नाने ‘हँगओव्हर… तुमच्या फ्री ड्रिंक्सचा! मी वर्षातून फक्त काही वेळा पार्ट्यांना जाते आणि लोक दर आठवड्याला पार्टी कशी करतात हे मला आश्चर्य वाटते. मी तुम्हांला नमन करते.’ असे लिहले आहे. अनेक चाहते ट्विंकल खन्नाच्या या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. ताहिरा कश्यप, रकुलप्रीत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.