बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ती नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरील शेअर करत असते. नुकताच उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या ड्रेसला फाॅन्ट करताना दिसत आहे. आपल्या सौंदर्याने ती नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करत असते. तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये उर्वशी ‘सो प्रिटी’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. यासाठी तिचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले आहे की, “Are you excited for my international music album?? Versace.”
उर्वशी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.
उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच तिचा ‘ओ चांद कहा से लाओंगी’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. याला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली आहे. आजकाल उर्वशी ही ‘मोहन भारद्वाज’ यांच्या ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-