हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली ही हॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अँजेलिनाने आतापर्यंत अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केले आहे. ज्यात जबरदस्त ऍक्शन चित्रपटांचा समावेश आहे. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या परिस्थितीमुळे लोकांसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोकांना युक्रेन सोडण्यास भाग पाडले गेले आहे. त्याचवेळी अँजेलिना जोलीने देखील लोकांची सद्यस्थिती दर्शवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR) कडून दिल्या जाणाऱ्या मदतीची झलक अभिनेत्रीने दिली आहे. तिने सांगितले की, दोन दिवसांत पन्नास हजारांहून अधिक युक्रेनियन लोकांनी सीमेवर आश्रय घेतला आहे.
अँजेलिनाने (Angelina Jolie) व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “४८ तासांत ५० हजारांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडले आहे. युक्रेनच्या सीमेवर असलेल्या मल्डोव्हा (Moldova) येथून माझ्या युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR) सहकाऱ्याने हा व्हिडिओ पाठवला आहे.”
निर्वासितांमध्ये महिला आणि मुलांची संख्या आहे अधिक
व्हिडिओमध्ये युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR) सदस्य असे म्हणताना ऐकू येत आहेत की, “परिस्थिती हृदय हेलावणारी आहे. गेल्या ३६ तासांत हजारो युक्रेनियन लोकांनी मल्डोव्हामध्ये आश्रय घेतला आहे. महिला व लहान मुले मोठ्या संख्येने येत आहेत. मल्डोव्हा अधिकाऱ्यांनी खूप मदत केली आहे. त्यांचे कोणतेही ओळखपत्र दाखवण्याव्यतिरिक्त लोकांना त्यांचे पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता नाही. लोक सीमेवर येत आहेत. बसेसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. निर्वासितांच्या मदतीसाठी स्थानिक समुदाय पुढे आले आहेत. त्यांना अन्न देणे, आधार देणे.”
BBC News
अँजेलिना जोलीने युक्रेनच्या लोकांसाठी वेदना केल्या व्यक्त
अँजेलिना जोलीने याआधी एक पोस्ट लिहून युक्रेनच्या लोकांबद्दलच्या वेदना व्यक्त केल्या होत्या. तिने लिहिले की, ”तुमच्यासारख्या अनेक लोकांप्रमाणे मीही युक्रेनच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. यावेळी माझे लक्ष, माझ्या सहकाऱ्यांसह, घरातून बेदखल झालेल्या आणि आजूबाजूच्या परिसरात निर्वासित झालेल्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आहे. मृतांचा आणि घरातून बाहेर पडलेल्या लोकांचा अहवाल आम्ही आधीच पाठवला आहे. पुढे काय होईल हे सांगणे खूप लवकर आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्वाची गोष्ट युक्रेनच्या लोकांसाठी आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमांसाठी ज्यावर काहीही अतिरंजित केले जाऊ शकत नाही.
अँजेलिना व्यतिरिक्त ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील युक्रेनमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. व्हिडिओ शेअर करून तिने युक्रेनमधील लोकांमध्ये पसरलेली भीती दाखवली.
हेही वाचा :
- प्रतीक सहजपाल आणि नीती टेलरचे ‘नैना मेरे’ गाणे रिलीझ, प्रेमाच्या सीझनमध्ये दोघांमध्ये दिसली रोमँटिक केमिस्ट्री
- टूर बसमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’चे प्रमोशन करताना पडता-पडता वाचली आलिया भट्ट, म्हणाली ‘असुरक्षित होत आहे’
- .. म्हणून श्रीदेवीसाठी रेखा करत होत्या डबिंग, जाणून घ्या हवा-हवाईच्या करीअरचा तो किस्सा