Monday, February 2, 2026
Home हॉलीवूड रुसने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनी अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचे दुःखद निधन

रुसने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनी अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचे दुःखद निधन

सध्या जागतिक स्तरावर एकच मोठा प्रश्न सर्वानाच पडला आहे की रुस आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध कधी थांबणार? मागील महिन्यात २४ तारखेपासून सुरु झालेल्या या युद्धाला आज तब्बल २२ दिवस उलटूनही हे युद्ध थांबायचे नाव घेत नाही. रुस सतत युक्रेनवर हल्ले करत असून या हल्ल्यांमध्ये युक्रेनी लोकांसोबतच अनेक जवान देखील शाहिद होत आहेत. यातच आता रुसच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेत्सचा मृत्यू झाला आहे. कीव शहरातील एका रहिवाशी इमारतीवर रुसकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये ओक्सानाचा मृत्यू झाला. मंडली यंग थियेटरकडून एक अधिकृत पत्रक जरी करत ओक्सानाच्या मृत्यूबद्दल पुष्टी केली आहे. या वक्तव्यामध्ये सांगितले गेले की, “किवमध्ये एका रहिवाशी इमारतीवर झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये ओक्साना श्वेत्स या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.

एका रिपोर्टनुसार ओक्साना यांचे वय ६७ वर्ष होते. त्यांना युक्रेनच्या सर्वोच्च मनोरंजनक्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. ज्याला ‘युक्रेनचे सन्मानित कलाकार’ म्हणून ओळखले जाते. ओक्साना श्वेत्सने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या मुख्य चित्रपटांमध्ये ‘द सीक्रेट ऑफ सेंट पेट्रिक’, ‘टुमॉरो विल बी टुमॉरो, ‘द रिटर्न ऑफ मुख्तार’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. ओक्साना श्वेत्सला युक्रेनच्या सन्मानित कलाकार म्हणूनही ओळखले जायचे.

ओक्साना श्वेत्स यांच्या मृत्यूनंतर यंग थियेटर कम्युनिटीने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याबद्दल माहिती देताना एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “किवच्या एका रहिवाशी इमारतीवर रुसकडून झालेल्या गोळीबारीदरम्यान युक्रेनी स्टार ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात आलेल्या शत्रुंना कोणतीही क्षमा नाही.” या पोस्टच्या माध्यमातून यंग कम्युनिटीने ओक्साना श्वेत्स यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तत्पूर्वी २४ फेब्रुवारीला सुरु झालेले रुस आणि युक्रेनचे युद्ध थांबायचे नाव घेत नाही. रुसकडून सतत युक्रेनवर हमला होत असून, आता युक्रेनच्या तोफांवर रुसी सेनेने लक्ष केले आहे. युक्रेन रुसने केलेल्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हत्यारांचा वापर केला जात आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, रुस युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर मोठा हल्ला करू शकते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा