Friday, February 21, 2025
Home बॉलीवूड जून महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘या’ धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

जून महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘या’ धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

मे महिन्यात प्रेक्षकांना अनेक रंजक कथा असलेले चित्रपट आणि वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ज्यामुळे प्रेक्षकांची चांगलेच मनोरंजन झाले होते. असाच मनोरंजनाचा तडका प्रेक्षकांना येत्या जून महिन्यातही पाहायला मिळणार आहे. जून महिन्यात अनेक थरारक कथा असलेल्या वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन होणार आहे. कोणत्या आहेत त्या वेबसिरीज आणि काय आहेत त्यांच्या कथा चला जाणून घेऊ.

आश्रम सीजन 3 – 
प्लॅटफॉर्म- एमएक्स प्लेयर
प्रदर्शनाची तारीख – 3 जून
प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजमध्ये अभिनेता बॉबी देओलने प्रमूख भूमिका साकारली आहे. या सिरीजचे पहिले दोनही सिजन तुफान गाजले होते. त्यामुळे प्रेक्षकांना या सिरीजची जोरदार उत्सुकता लागली आहे. बॉबी देओल व्यक्तिरिक्त या सिरीजमध्ये अदिती पोहणकर, चंदन रॉय, त्रिधा चौधरी, इशा गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.

आशिकाना- 
प्लॅटफॉर्म- डिज्नी प्लस हॉटस्टार
प्रदर्शनाची तारीख – 6 जून
‘आशिकाना’ वेबसिरीजची कथा एका सराईत गुन्हेगाराच्या शोधात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याशी संबंधित आहे. याचवेळी एका महिलेशी त्याची ओळख होते. जिचा भुतकाळ खूपच भयंकर असतो. या सिरीजमध्ये आबाद खान आणि खुशी दुबे मुख्य भूमिकेत आहेत.

मिस मार्वल- 
प्लॅटफॉर्म- डिस्ने प्लस हॉटस्टार
प्रदर्शनाची तारीख – 8 जून
या चित्रपटात इमान वेल्लानी मिस मार्वलची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात मिस मार्वल उर्फ ​​कमला खान ही एक गेमर आहे ज्याचे स्वप्न कॅप्टन मार्वलसारखे बनण्याचे आहे. या चित्रपटात फरहान अख्तरही दिसणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अर्ध –
प्लॅटफॉर्म– G5
प्रदर्शनाची तारीख – 10 जून
अर्ध ही एका जोडप्याची कथा आहे जे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी मुंबईत जातात. जेव्हा शिवला मुंबईत उदरनिर्वाहाचा त्रास होतो तेव्हा तो आपल्या पत्नीसोबत ट्रान्सजेंडर असल्याचे भासवतो. पलाश मुच्छाल दिग्दर्शित या चित्रपटात राजपाल यादव आणि रुबिना दिलीक यांच्याशिवाय हितेन तेजवानी आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

शी सीझन २
प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख – 17 जून
या मालिकेत आदिती पोहनकर मुख्य भूमिकेत आहे. आदिती या मालिकेत महाराष्ट्र पोलीस हवालदाराची भूमिका साकारत आहे, जी ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करण्यासाठी कव्हर करते. आरिफ अली आणि अविनाश दास दिग्दर्शित या मालिकेची निर्मिती इम्तियाज अली यांनी केली आहे.

कॅट-
प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख – जून
रणदीप हुड्डा कॅटमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. ही पंजाबवर आधारित क्राइम थ्रिलर सिरीज आहे. गुंड, पोलीस, ड्रग्ज विक्रेते आणि राजकारण यांच्यात अडकलेल्या माणसाची ही कथा आहे. या मालिकेतून रणदीप हुडाचा लूकही समोर आला आहे. ही मालिका जूनमध्ये Netflix वर स्ट्रीम होईल, परंतु अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

देशातील पहिली ‘के-पॉप’ स्टार बनली ओडिशाची श्रेया लेंका, ऑडिशनसाठी ऑनलाइन शिकली कोरियन भाषा

‘एका राजकीय पक्षामुळे…’ नाटकाचा प्रयोग रद्द झाल्यानंतर अभिनेता उमेश कामतची ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

स्पृहा जोशीचा खजिना स्पेशल एपिसोड, प्राण्यांचे अनाथाश्रम काढणाऱ्या गणराज जैन यांच्या रंजक कथा ऐकून व्हाल थक्क

 

हे देखील वाचा