Saturday, April 27, 2024

‘एका राजकीय पक्षामुळे…’ नाटकाचा प्रयोग रद्द झाल्यानंतर अभिनेता उमेश कामतची ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून उमेश कामतची (Umesh Kamat) ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि देखण्या लूकसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या उमेशने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया सोशल अकाउंटवरुन तो नेहमीच विविध विषयांवर आपले मत व्यक्त करत असतो. सध्या अभिनेत्याची अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने राजकीय नेत्यामुळे त्याचे नाटक रद्द झाल्याचे सांगितले आहे. 

अभिनेता उमेश कामत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अनेक मालिका, चित्रपट, वेबसिरीजमधील आपल्या अभिनयासाठी तो चांगलाच प्रसिद्ध आहे. सध्या उमेश कामतची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने ‘दादा एक गुड न्यूज’ या त्याच्या बहुचर्चित नाटकाबद्दलची माहिती शेअर केली आहे.आपल्या स्टोरीवर त्याने “एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे ५ जूनचा चिंचवडमधील दादा एक गुड न्यूज नाटकाचा प्रयोग रद्द झाला आहे. प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत दिले जातील,” असे म्हणले आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेता उमेश कामतची ही पोस्ट ऋता दुर्गुळेनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लावली आहे. दादा एक गुड न्यूज या नाटकात उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हे नाटक सध्या रंगमंचावर चांगलेच लोकप्रिय होत आहे. बहिण भावाच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करणारे हे  नाटक प्रेक्षकांनाही आवडले असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर उमेश कामतच्या आणखी काय हवं या वेबसिरीजचीही चांगलीच चर्चा झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा