सध्या देशभरातील क्रिकेट प्रेमींना २४ ऑक्टोबरला भारत पाकिस्तानच्या सामन्याची उत्सुकता खूपच वाढली आहे. वर्ल्डकपची घोषणा होताच या सामन्याच्या तिकिटाची विक्रमी विक्री झाली होती. यामध्ये सिनेकलाकार सुद्धा आघाडीवर आहेत. नेहमीच भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे देशात नाही परदेशातही तुफान गाजतो. या सामन्यातील थरार टीव्हीवरच उत्सुकता वाढवणारा असतो. तर प्रत्यक्षात सामना बघताना किती रोमांचकारी असेल? ही कल्पनाच किती सुखकारक वाटते. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने या सामन्याच गोल्डन सीटसाठी तिकीट खरेदी केल आहे.
उर्वशी रौतेला ही हिंदी चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. उर्वशी दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटात तिने काम केले आहे. ती सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी उर्वशीच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी भारत पाकिस्तान सामन्यासाठी खूपच उत्सुक झाली असून तिने स्वतः साठी या सामन्याचे गोल्डन तिकीटसुद्धा बुक केले आहे. उर्वशी खूप मोठी क्रिकेटप्रेमी असून कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्धचा रोमांचकारी सामना पाहण्यासाठी आतुर झाली आहे.
उर्वशी रौतेला सध्या तिच्या आगामी एक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकताच तिने तिच्या आगामी ‘दिल है ग्रे’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरुन शेअर केले होते. हा तामिळ चित्रपट ‘थिरुट्टु पायले2’ चा हिंदी रिमेक आहे. दरम्यान उर्वशी एका मोठ्या चित्रपटाद्वारे तामिळ चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये ती सुक्ष्मजीव शास्त्रज्ञाची आणि आयआयटीएनची भूमिका साकारणार आहे.
याचबरोबर उर्वशी एका द्विभाषी थरारपटात झळकणार आहे. ती ‘ब्लॅक रोझ’ सिनेमात दिसून येणार आहे. अलीकडेच उर्वशी गुरू रंधावा सोबतच्या ‘डूब गए’ गाण्यामुळे चर्चेत आली होती. तसेच मोहम्मद रमादान सोबतच्या ‘वर्साचे बेबी’ गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. उर्वशी लवकरच जिओ स्टुडिओची वेब सिरीज ‘इंस्पेक्टर अविनाश’ मध्ये रणदिप हुड्डा सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सुपरकॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्राच्या सत्यकथेवर आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’
–अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज
–यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित