Monday, June 24, 2024

‘मी एक-दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला…,’ उर्फिचा धक्कादायक खुलासा

उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फीला पहिल्यांदा करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी शोमधून लोकप्रियता मिळाली. ती स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. तिच्या खासगी जीवनाविषयी फारशी कोणाला माहिती नाही. नुकतीच तिने एक मुलाखतीत तिच्या खासगी जीवनाविषयी धककादायक खुलासे केले आहे.

उर्फीने (Urfi Javed) एका मुलाखतीत तिच्या खासगी जीवनाविषयी सांगताना ती म्हणाली की, ती लखनऊमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिच्या पालकांना पाच मुले होती त्यात उर्फी ही दुसरी आहे. तिचे वडील आई आणि भावंडांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करायचे. तिच्यावर बालपणापासून खुप बंधने घातली गेली. त्त्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पुढे ती सांगते की, ‘जर कोणी तुम्हाला घरात दररोज शिव्या देत असेल, मारहाण करत असेल तर तुम्हाला कसे वाटेल? त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी एक-दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला.’ असा खुलासा उर्फीने केला आहे.

ती जास्त टीव्ही बघायची म्हणून तिचा फॅशनकडे नेहमीच कल असायचा. पण तेव्हा तीला फॅशनची फारशी समज नव्हती. ती म्हणते की, ‘पण काय घालायचे हे माहित होते. मला वेगळे उभे राहायचे होते. मी पार्टीला जायचे तेव्हा लोक माझ्याकडे बघायचे.’

उर्फीने सांगितले की, ‘मला नेहमी पैशाची काळजी होती. ती मोठी होत असताना तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. पण माझ्या मनात श्रीमंत मुलीचे स्वप्न फुलायचे. स्रीयांनी पुरुषाच्या मागे न धावता पैशाच्या मागे धावावे अशी तिची विचारधारा होती. (urfi-javed-chilhood-struggle-family-situation-tried-sucide-because-father-beat-her-and-mother)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मराठी अभिनेत्याचे ट्विट चर्चेत, ‘मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो…’
जरा जपून! हिम्मत असेल तरच उर्फीचे हे फाेटाे पाहा

हे देखील वाचा