Sunday, June 23, 2024

उर्फी जावेदने केला कहर केवळ एक जाळी गुंडाळत केले फोटोशूट तर हाताने झाकली फ्रंट बॉडी

बिग बॉसच्या ओटीटीमध्ये गेल्यानंतर लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्री उर्फी जावेदला तिच्या अतरंगी आणि हटके फॅशनने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. उर्फीने आजच्या काळात फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिच्या फॅशन सेन्सने धमाका केला. दररोजच उर्फी तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर गाजताना दिसते. उर्फीचे नाव डोक्यात आले की ती आणि तिचे विचित्र कपडेच डोळ्यासमोर येतात. तिची फॅशन भल्याभल्या लोकांना विचार करायला लावते. उर्फीची नवीन पोस्ट आली की आता काय तिने नवीन घातले यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. उर्फी कोणाला आवडो किंवा न आवडो तिची फॅशन कधीच कानाडोळा होऊ शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

आता पुन्हा एकदा उर्फीने तिच्या नवीन फॅशनने आग लावली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले असून, सध्या सगळीकडे फक्त याच फोटोंची चर्चा आहे. उर्फीचे हे फोटो अतिबोल्ड असून, यात तिने कपडे घातलेले नसून केवळ एका काळ्या रंगाच्या नेटने तिच्या शरीराला कव्हर केले असून, एका हाताने तिने तिच्या शरीराचा पुढचा भाग झाकला आहे. यासोबत तिने लॉन्ग बूट्स घातले असून, केसांना लाल रंगाचा कलर दिला आहे. उर्फीचा हा लूक पाहून लोकांचे डोळे मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.

याआधी देखील उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती खूपच भयंकर लूकमध्ये दिसत होती. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता आणि ड्रेसवर वरून खालपर्यंत ‘डर्टी’ लिहिले होते. यायाधी देखील उर्फीने तिच्या लुकसोबत प्रयोग करत तिच्या आयब्रो झाकल्या होत्या. केसाना लाल रंग दिला होता. यात ती खूपच भयानक दिसत होती. उर्फीला नेहमीच तिच्या कपड्यांमुळे आणि तिच्या बोल्ड व्यक्तव्यांमुळे ट्रोल केले जाते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा