राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असतात. पण बऱ्याच वेळा अशा काही घडामोडी घडतात त्याने संपूर्ण राजकारण ढवळून निघालं या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अशीच काहीशी स्थिती आहे. राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. शिवसेना पक्षात फुट पडल्याने दोन गट तयार झाले. त्यावर अनेक चर्चा झाल्या. शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याने राजकारणात खळबळ उडाली. यामुळे सुप्रीम किरतात सुनावणी सुरु होती. आता पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे. अशातच एका मराठी अभिनेत्याने ट्विट केले आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
चित्रपटातील कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे फोटो, व्हिडीओ, किंवा त्यांचे मत आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच अभिनेता संदीप पाठक (sandeep pathak) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्याने असे लिहले की, ”मा. बाळासाहेब ठाकरेंची ( balasaheb thackray) इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं ट्विट करत संदीपने राज्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आप अशा सर्व पक्षांना टॅग केले आहे.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @INCIndia @AAPMumbai— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023
यावर नेटकऱ्यांनीही कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पोस्ट केलं आहे. तर काहींनी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान होऊ शकतात, असं म्हटलं आहे. तसेच काहींनी अभिजित बिचुकले यांचे नाव घेत ते पंतप्रधान होऊ शकतात असे म्हंटले आहे.
संदीप पाठकने यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहे. त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्याने अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केले आहे. तो नेहमी त्याचे मत स्पष्टपणे मांडल असतो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पत्नीच्या ‘या’ गोष्टीला अक्षरशः कंटाळलाय शाहिद कपूर, म्हणतोय ‘त्याच्याशीच लग्न कर’
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला भविष्यात करायची आहे ‘ही’ भूमिका, स्वतःचा केला त्याचा खुलासा