Wednesday, April 23, 2025
Home अन्य उलटा ब्लाऊज घातलाय का? उर्फीचा व्हिडिओ पाहून डोक्यालाच हात लावाल

उलटा ब्लाऊज घातलाय का? उर्फीचा व्हिडिओ पाहून डोक्यालाच हात लावाल

लोकप्रियता तिला तिच्या फॅशनने मिळवून दिली. तिने लोकप्रियतेचे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढत प्रसिद्धी मिळवली आहे. अतिशय साध्यातल्या सध्या कपड्याने ग्लॅमरचा तडका लावण्याचे कसब उर्फीला योग्य पद्धतीने जमते. प्रत्येक दिवशी उर्फीचा हटके आणि कल्पनेपलीकडील लूक सर्वांना पाहायला मिळतो.

नुकतेच उर्फीला एका ठिकाणी स्पॉट केले गेले तेव्हा तिने अतिशय साधी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची शिफॉन साडी नेसली होती मात्र तिच्या या साडीपेक्षा साडीवर घातलेल्या ब्लाऊने तिच्या लुकला ग्लॅमर मिळवून दिले आहे. तिच्या ब्लाऊजला बर्फीच्या आकारत तिने मोठे कट देण्यात आले होते. शिवाय तिने साडीचा पदर देखील असा घेतला होता की, तिचे ब्लाऊज नीट दिसेल. तिच्या या लूकमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पुन्हा एकदा उर्फी तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. आता हा व्हिडिओ पाहून इतरांसारखा तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडेल की, उर्फीने ब्लाऊज तर घातले आहे, मात्र ते उलटे घातले की, सुलटे? हो, उर्फीचे ब्लाऊजचे असे आहे जे पाहून असे प्रश्न निर्माण होते अगदी साहजिक आहे.

तिच्या या लूकमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सला खाद्य मिळाले असून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नेटकऱ्यांनी तिला ‘जगातील सर्वात गरीब घराण्यातील मुलगी. बिचारीची कधीच संघर्ष सुरु आहे.” असे म्हटले आहे. मात्र आता उर्फीला लोकांच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाही. तसे पाहिले तर उर्फीची फॅशन जास्त कोणालाच आवडत नाही. मात्र तरीही ती तिला योग्य वाटेल आणि आवडेल ते ती घालते. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, तिने कमेंट्स वाचणे बंद केले असून, तिला बलात्काराच्या, खुनाच्या धमक्या देखील मिळत आहे. मात्र तरीही ती यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि तिचे काम करते.

हेही वाचा :

हे देखील वाचा