बिग बॉस ओटीटी शोमधून सर्वात जास्त पुढे आलेली आणि गाजत असलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. उर्फीला जेवढी लोकप्रियता तिच्या मालिकांमधून, बिग बॉसमधून नाही मिळाली तेवढी लोकप्रियता तिला आता तिच्या वेगवेगळ्या अतरंगी फॅशनमुळे मिळताना दिसते. रोज उर्फीचे विविध हटके फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात. उर्फी नेहमीच तिच्या बोल्ड आणि क्लासी फोटोनी सोशल मीडियावर आग लावताना दिसते. उर्फीने पुन्हा एकदा आठवड्याच्या शेवटी तिच्या लूकने खळबळ उडवली आहे.
उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही मादक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच आकर्षक आणि लक्षवेधी दिसत असली तरी तिला या फोटोंमुळे उप्स मुव्हमेंटचा सामना देखील करावा लागला. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची ब्रा घातली असून, त्यावर काळ्याच रंगाचा शॉर्ट स्कर्ट घातला आहे. या ड्रेसवर तिने हेव्ही नेकपीस आणि कानातले घातले असून, उर्फीने तिच्या या ज्वेलरीने तिच्या लुकला एथनिक टच दिला आहे. तिची ब्रा छोटी असल्याने इथेच ती उप्स मुव्हमेंटचा शिकार झाली आहे.
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “बस असेच.” तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्सचा तडाखा लावला आहे. उर्फीने पहिल्यांदाच नाही तर याआधी किंबहुना नेहमीच ती तिचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. उर्फी नेहमीच तिच्या फॅशनवर प्रयोग करताना दिसते. ती तिच्या फॅशनमुळे बहुतकरून ट्रोल होताना दिसते. मात्र तरीही ती लोकांचा विचार न करता तिला पाहिजे तसेच ती राहते.
नुकताच उर्फीने पिवळ्या रंगाचा शर्ट उलटा घालून त्याचे फक्त एकच बटन लावले होते. तिचा हा लूक खूपच चर्चेत आला आणि त्यावर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स दिल्या आहेत.
हेही वाचा :