गेल्या काही दिवसांपसून उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या मध्ये वाद सुरु झाला असून तो वाढत जात आहे. सतत आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशेन सेन्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदवर ‘मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागनी चित्रा वाघ यांनी केली असून त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मात्र, उर्फीने देखिल त्यांना नवीन वर्षाचं आव्हानच दिलं आहे.
‘बिग बॉस’ फेम प्रिसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया इनफ्लुएंसर उर्फी जावेद (Urfi Javed) ही आपल्या फॅशन सेन्समुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना कारावा लागतो मात्र, यावेळेस नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उर्फीसमोर नवीन अडचनी आल्या आहेत. भाजप नेता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप केला आहे. मात्र, उर्फीदेखिल शांत बसणाऱ्या मधली नाही. तिने देखिल त्यांना थेट आव्हान दिलं आहे.
उर्फीने आपल्या अधिकृत इंस्टा आणि ट्वीटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मला ट्रायल किंवा मुर्खपणा नकोय. जर तुम्ही तुमची आणि कुटुंबियांची संपत्ती जाहीर केली, तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमवतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत.”

उर्फीने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, आणखी एका राजकारण्यानी दाखल केलेल्या तक्रारपासून माझ्या नवीन वर्षाची सुरुवात झाली. खरं तर या राजकारण्यांकडे काही कामच नाही. हे राजकारणी मुर्ख आहेत का? संविधानात असा कोणता कलमच नाही, ज्याच्या आधारे मला तुरुंगात टाकू शकती. अश्लीलती आणि न्युडिटीची संकल्पणा त्या व्यक्तीनुसार बदलते. जर माझ्या शरीराचा ठरावीक भाग दिसेल नसेल तर तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. हे फक्त मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी करत सुरु आहे.
— Uorfi (@uorfi_) January 1, 2023

त्याशिवया एका पोस्टमध्ये उर्फीने चित्रा वाघ यांना सल्ला देत सांगितेल की, “माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, ज्या अजूनही चालू आहेत.” अशाप्रकारचा सल्ला देत तिने चित्रा वाघ यांच्या ट्वीटनंतर प्रतिउत्तर दिलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोणी मराठी तर कोणी बॉलिवूडमध्ये करतय पदार्पण, 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार ‘या’ टीव्ही अभिनेत्री
‘मेरी जान’ म्हणत प्रियसीसोबत रोमॅंटिक होणाऱ्या हनी सिंगने फॅन्सला हटके अंदाजमध्ये केले न्यू इयर विश