Friday, June 13, 2025
Home अन्य मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये उर्फी दिसतेय एकदम स्टनिंग, तुम्ही पाहिला का फोटो?

मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये उर्फी दिसतेय एकदम स्टनिंग, तुम्ही पाहिला का फोटो?

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही इंटरनेट सेंसेशन बनली आहे ती जिथे कुठे जाते, जे काही करते ते फोटोग्राफर सगळं काही कैद करतात. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज इथूनच लावू शकतो की, सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

अशातच उर्फीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. काही तासापूर्वी शेअर केलेल्या शेअर केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. (Urfi Javed share her glamorous photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “काळा रंग मला फिट दाखवतो, तर हिरव्या रंगामध्ये तुम्ही जाड दिसता.” या कॅप्शनमधून तिला चाहत्यांना असे सांगायचे आहे की, जर तुम्हाला पार्टीमध्ये फिट दिसायचे असेल, तर तुम्ही काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. या ऑफ शोल्डर ड्रेससोबत तिने इअरिंग घातले आहेत. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत, ज्यामध्ये ती स्टनिंग दिसत आहे. या ड्रेससोबत तिने न्यूड मेकअप केला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

उर्फी जावेदबाबत एक खास गोष्ट म्हणजे, ती जे काही घालते त्याबाबत तिला खूप आत्मविश्वास असतो. तिच्या वेगवेगळ्या स्टाईलमुळे बऱ्याचवेळा ती ट्रोल देखील होत असते, परंतु या सगळ्या गोष्टीचा तिला काहीही फरक पडत नाही. या आधी तिने सोशल मीडियावर एक बॅकलेस ड्रेस घातलेला फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता आणि हातात कॉकटेलचा ग्लास घेतला होता.

बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिने नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा कोणताही फोटो असो किंवा डान्स व्हिडिओ असो तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर जसे तिला ट्रोल करणारे आहेत, तसेच तिचे चाहते देखील भरपूर आहेत. जे नेहमीच तिच्या प्रत्येक पोस्टला प्रेम देत असतात. ट्रोल करणाऱ्या व्यक्तींकडे ती नेहमीच दुर्लक्ष करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जाळ अन् धूर संगटच! नोराच्या ग्लॅमरस फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग, पडतोय लाईक्सचा पाऊस

-स्वत:चा जुना फोटो शेअर करत अनुपम यांनी नेटकऱ्यांना विचारला ‘हा’ प्रश्न, चाहते म्हणाले…

-मौनी रॉयच्या पिपाणीवर ‘नागराज’ बनून रणवीर सिंगने धरला ठेका, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

हे देखील वाचा