Thursday, June 13, 2024

‘हे तुमचे नेता आहेत का?’ राहुल गांधीना ट्रोल केल्यावर उर्फीने भाजप नेत्याची घेतली शाळा

बिग बॉस ओटीटी‘ फेम आणि सोशल मीडिया इनफ्लएन्सर म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद सतत आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळेस उर्फी भलत्यात कारणामुळे चर्चेत आली आहे. सतत तिच्या कपड्यावरुव ट्रोल होणारी उर्फीची पुन्हा एकदा खोड काढली आहे. भाजप नेत्यने राहुल गांधी यांची तुलना थेट उर्फीशी केली आहे त्यामुळे ती चांगलीच तापली आहे. तिने ट्वीट शेअर करत भाजप नेत्याची चांगलीच शाळा घेतली आहे.

नॅशनल कॉंग्रसे पक्षाचे राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या आपल्या ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) मुळे खूपच चर्चेत आहेत. राहुल गांधी सध्या दिल्लीमधील कडाक्याच्या थंडीमध्येही टी-शर्टवर यात्रेमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यामुळे राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला होता मात्र, यावर भाजप नेता दिनेश देसाई (Dinesh Desai) यांनी राहुल गांधीवर टीका करत वाद निर्माण होईल असं ट्वीट शेअर केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी उर्फीच्या नावाचा उल्लेख केला आहे. (BJP leader Dinesh Desai criticized Rahul Gandhi and tweeted that controversy will arise)

भाजप नेता दिनेश देसाई यांनी ट्वीट शेअर करत लिहिले की, “जर कडाक्याच्या थंडीमध्ये फक्त टी-शर्ट घलून राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र ठरत असतील तर मग, उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी.” उर्फी एवढी शांत बसणाऱ्यातली नसून तिने देखिल प्रतिउत्तर दिलं आहे. तिने देखिल ट्वीट शेअर करत भाजप नेत्यावर पलटवार केला आहे.

उर्फीने ट्वीट शेअर करत लिहिले की, “हे तुमचे राजकारणी आहेत का? काहीतरी चांगलं करा! अशा लोकांकडून महिलांना सुरक्षा पुरवण्याची अपेक्षा कशी करू शकतो आपण?” उर्फीने थेट नेत्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. उर्फीच्या अशा ट्वीटनंतर देसाई यांनीअजून एक ट्वीट शेअर करत लिहिले की, “भारताची संस्कृती किंवा महिलांचा सन्मान याच्याशी संबंधित महिलेचा काहीही संबंध नाही. आमच्यासठी झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रेरणास्थान आहेत. तुमचे सोशल मीडिया फोटो आणि व्हिडीओ नाहीत”, असं खेचक ट्वीट शेअर करत त्यांनी उर्फीच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

देसाई यांनी उर्फाच्या प्रश्नावर खोचक उत्तर दिलं आहे मात्र, उर्फीने अजून याच्या काहीच प्रतिक्रिय दिली नाही. मात्र, यानंतर उर्फीन अजून ट्वीट करेल का? हे पाहाणे खपूच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
अपयश पचनी पडत नसल्याने राजेश खन्ना यांनी एकदा दारूच्या नशेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न
ज्या सिनेमाने राजेश खन्ना यांच्या करिअरला दिली मोठी उसळी, तोच करायला राजेश खन्ना ‘या’ कारणासाठी नव्हते तयार

हे देखील वाचा