Sunday, May 19, 2024

‘तुमच्यासारख्या लोकांमुळे मला…’, भारतीय हॉकी खेळाडूच्या कमेंटमुळे ढसाढसा रडली उर्फी जावेद

सोशल मीडियाची इनफ्लुएंसर आणि टीव्ही अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद ही सतत आपल्या स्टाइल आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. मात्र, अनेकदा तिला तिच्या स्टाइलमुळे ट्रोलिंगचा सामना देखिल करावा लागतो. पण उर्फीला कोणाला कशाप्रकारे उत्तर द्यायला पाहिजे हे चांगलच ठाऊक आहे. पुन्हा एकदा उर्फीसोब असे काही घडले आहे, ज्यामुळे थेट हॉकी खेळाडू युवराज वाल्मीकि याच्याशी तिचे भांडण पेटले आहे.

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही सध्या दुबई प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. पॅपराजींनी सोशल माडियावर  नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. जो तुफान व्हायरल झाला आहे. मात्र, भारतीय हॉकी खेळाडू युवराज वाल्मिकी याने व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एक कमेंट केली आहे ज्यामुळे उर्फी खूपच संतापली आहे. व्हिडिओमध्ये उर्फी अटक झाल्याचे दाखवले होते, त्या व्हिडिओवर युवराजने कमेंट करत लिहिले होते की, “धन्यवाद दुबई! हिला नेहमीसाठी तुमच्याकडेच ठेवा.”

युवराजची कमेंट पाहिल्यानंतर उर्फीनेही सडेतोड उत्तर दिले आहे. तिने कमेंट करत लिहिले की, “तुला जर माझ्या कपड्यांवरुन एवढीच अडचन आहे, तरीही माझ्या वैयक्तीक अकाउंटवर मेसेज करत आहेस. तसंही माझ्याकडे अजूनही तुझ्या मेसेजचा स्रिनशॉर्ट आहे.” यानंतर युवराजने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “उर्फीचा मेंदू खराब झाला आहे. मी कधी असे म्हटले नाही पण, खरंच ती एक कलंक आहे. जर तिच्याकडे मेसेज आहे तर ती शेअर करु शकते. मी पॅपराजींच्या पोस्टवर कमेंट केली होती कारण त्यांनी उर्फीला प्रमोट करणं बंद करावं म्हणून. एका व्यक्तीला एवढी समज असते की, कोणते कपडे कुठे परिधान करायला पाहिजे.”

urfi javed
Photo Courtesy: Instagram/urf7i

उर्फीने युवराजच्या कमेंटसोबत स्वत:चा एक व्हिडिओ इंस्टा स्टोरीला टाकला आहे. युराजला उत्तर देत असताना अक्षश: उर्फीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. तिने सांगितले की, “युवराज लोकांसाठी पब्लीक फिगर आहे. त्याचे माझ्या कपड्यांवर कमेंट करणे हे जास्त लोकांपर्यत पोहोचलं आहे आणि याचा फकरक सोशल मीडिया युजर्सवरही पडू शकतो.” उर्फीच्या मते युवराजसारख्या लोकांमुळे दुसऱ्या लोकांना फायदा घेणाची संधी मिळते आणि त्यामुळे तिला रेप आणि जिवे मारण्याची धमक्या देण्याची हिम्मात लोकांमध्ये वाढते. त्यासोबत उर्फिने सांगितले की, “युवराजने हे सगळं बंद केलं पाहिजे.”

युवराज वाल्मिका हा 33 वर्षीय भारतीय संघामधील फिल्ड हॉकी खेळाडू आहे. त्याला प्रिंस ऑफ इंडियन हॉकी या नावानेही ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
किशोरदांच्या चित्रपटात रफीसाहेबांना गाणं गायला लावणारी शंकर-जयकिशन संगीतकार जोडी, का पडली नात्यात फूट?
वाढदिवस विशेष..! सुरांचे बादशाह मोहम्मद रफी यांनी ‘या’ कारणामुळे सोडलं होतं गाणं, कारणही गंभीर

हे देखील वाचा