Sunday, January 26, 2025
Home अन्य उर्फी जावेदचा मुस्लिम कट्टरपंथीयांवर जोरदार हल्ला! म्हणाली, ‘महिलांनी बुरखा घालणे…’

उर्फी जावेदचा मुस्लिम कट्टरपंथीयांवर जोरदार हल्ला! म्हणाली, ‘महिलांनी बुरखा घालणे…’

उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या निराळ्या फॅशन सेन्समुळे सतत चर्चेत असते. याशिवाय मुस्लीम समाजाबद्दलही ती उघडपणे मत व्यक्त करते. अलीकडेच उर्फीने सांगितले होते की, तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरील बहुतेक घाणेरड्या कमेंट मुस्लिम लोकांच्या आहेत. यासोबतच तिने कोणत्याही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. आता उर्फीने मुस्लिम कट्टरतावाद्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

कट्टरतावादी मुस्लिमांवर साधला निशाणा
वास्तविक, उर्फी जावेदचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी म्हणतेय की, “जो कोणी माझ्या फोटोंवर कमेंट करतो की, मी इस्लामवर एक डाग आहे, माझ्या विरोधात फतवा काढला पाहिजे, माझे कपडे असे आहेत… माझे कपडे तसे आहेत. तुम्हाला कुराण माहित आहे का? स्त्रियांना जबरदस्तीने बुरखा घालायला हवा, असे कुठेही लिहिलेले नाही. होय, स्त्रीने बुरखा घालावा असे नक्कीच लिहिले आहे. स्त्रीने बुरखा घातला नाही, तर तिला शिवीगाळ करा असे लिहिलेले नाही. हो, पण पुरुषांनी डोळ्यावर बुरखा घालणे आवश्यक आहे, असे नक्कीच लिहिले आहे. विवाहापूर्वी पुरुष महिलांकडे त्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही.” (urfi javed slams muslim extremists over religion video viral)

पूर्वी महिलांकडे नव्हते कोणतेही अधिकार
उर्फी जावेदने पुढे माफी मागितली आणि म्हणाली की, “जे इंस्टाग्रामवर मुलींना पाहतात आणि त्यांच्या फोटोंवर अनावश्यक कमेंट करतात ते सर्व हराम आहेत. तुम्ही अशा स्त्रियांचे फोटो पाहू शकत नाही, विशेषतः जेव्हा तिने कपडे घातलेले नाहीत. इस्लामचे जे नियम बनवले आहेत ते दीड हजार वर्षांपूर्वी बनवले गेले होते. तेव्हा महिलांना कोणतेही अधिकार नव्हते. इस्लाममध्ये चार लग्नालाही परवानगी आहे. कारण त्यावेळी महिलांचे पती मरायचे, नंतर त्यांच्यावर बलात्कार व्हायचा आणि त्यांना न्याय मागण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी चार विवाहांना परवानगी देण्यात आली होती.”

स्वतः नाही फॉलो करत कुराण
ती पुढे म्हणाली, “माझ्याकडे बघा, मी अशक्त स्त्रीसारखी दिसत आहे का? नाही. मी तुमची मदत मागत नाही आणि मला तुमच्या सल्ल्याचीही गरज नाही. इस्लाममध्ये अशा किती गोष्टी लिहिल्या आहेत, ज्याचे तुम्ही स्वतः पालन करत नाही आणि मग मुलीला सांगता की असे नाही, असे कपडे घाला.” उर्फी जावेदने पुढे असेही सांगितले की, “इस्लाममध्ये लग्नापूर्वी सेक्स हराम आहे, परंतु तरीही लोक ते करतात. पाचही वेळेची नमाज अदा करणारे किती लोक आहेत? मला वाटत नाही कोणी हे करेल. जर तुम्ही पाच वेळा नमाज पठण केले तर तुम्हाला इंस्टाग्राम मुलींच्या फोटोंवर कमेंट करायला वेळच मिळणार नाही.”

मी इस्लामचे पालन नाही करत
उर्फी जावेद शेवटी म्हणाली, “मला एक गोष्ट सांगायची आहे की, मी इस्लामचे पालन करत नाही. अल्लाह म्हणतो की, तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. जर तुम्ही ते मनापासून करत नसाल किंवा फक्त वर जाण्यासाठी करत असाल. जर तुम्ही पाच वेळेची नमाज आणि जे काही करत असाल त्याने तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करा, गरीब व्यक्तीला मदत करा आणि महिलांकडे अशा प्रकारे पाहणे बंद केले, तरच कुठेतरी तुम्हाला खरा मुस्लिम म्हटले जाईल.”

उर्फीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहीजण तिचे कौतुक करत आहेत, तर काही तिला पुन्हा ट्रोल करत आहेत.

हेही वाचा-

हेही पाहा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा