बाबो! रिलेशनशिपबद्दल ‘हे’ काय बोलली जान्हवी कपूर; म्हणतेय, ‘सध्या मला बॉयफ्रेंड नाही पण तरीही…’

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप सिनेजगतात पाडणारी जान्हवी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांनाही जान्हवीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते. अलिकडेच जान्हवीने तिच्या लव लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे. काय म्हणालीव ती नेमके चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या अभिनयाइतक्याच प्रेमप्रकरणामुळेही नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्रींच्या प्रेमप्रकरणाची, ब्रेकअपची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेला पाहायला मिळते. अलिकडेच बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या रिलेशनशीपबद्दल मोठा खुलासा केला आहे. यामध्ये जान्हवीने सांगितले की, सध्या ती सिंगल आहे आणि खुप आनंदीसुद्धा आहे परंतु कधी कधी तिला खूपच एकटे वाटू लागते. परंतु जर कोणी तिच्या जवळ यायला लागले तर ती त्या व्यक्तीपासून लांब  जाण्यातच धन्यता मानते असेही जान्हवीने सांगितले.

त्याचबरोबर जान्हवी कपूरला तिचा बॉयफ्रेंड कसा असावा याबद्दल विचारल्यानंतर तिने सांगितले की, माझ्यासोबत नीट वागला, चांगला राहिला, मला नेहमी हसवले तर मी सुद्धा त्याच्याशी तितकीच खुश राहीन. अलिकडेच जान्हवी कपूर करण जोहरच्या चॅट शोमध्ये सारा अली खानसोबत सामील झाली होती त्यावेळी तिने याबद्दलचे अनेक खुलासे केले होते. शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत जान्हवीचे नाव जोडले गेले होते.  दोघांनी ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर जान्हवी राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या क्रिकेटवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. तिच्याकडे वडील बोनी कपूरच्‍या प्रॉडक्‍शनचा ‘मिली’ चित्रपटही आहे.

दरम्यान, जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवी प्रमाणे तिची बहीण खुशी कपूरही लवकरच सिनेजगतात पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

‘भाईजान’च्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा, मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात दिसला सलमान

ठरल तर! अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात

आई बनल्यानंतर ‘अशी’ झालीये सलमानच्या अभिनेत्रीची तब्येत, जुना फिगर मिळवण्यासाठी जिममध्ये गाळतेय घाम

 

Latest Post