Wednesday, March 19, 2025
Home बॉलीवूड उर्वशीच्या गळ्यात रिषभ पंतची चेन? फाेटाे पाहून चाहतेही झाले कनफ्यूज

उर्वशीच्या गळ्यात रिषभ पंतची चेन? फाेटाे पाहून चाहतेही झाले कनफ्यूज

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) हिला यापूर्वी ऑस्ट्रेलियातील तिच्या इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-20 विश्वचषक 2022 साठी सराव करत असताना, अभिनेत्री देखील भारताच्या संघाचा एक भाग आहे. ती क्रिकेट टीमच्या ऋषभ पंत(Rishabh Pant) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची आणि डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता उर्वशीचा नुकताच आलेला व्हिडिओ लोकांना संकेत देत आहे की दोघांमध्ये काही खिचडी शिजत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाबाबत भाष्य करणाऱ्या विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. यातील एका पोस्टने विशेष लक्ष वेधूून घेतले आहे. ट्विटरवर दावा केला जात आहे की उर्वशी रौतेलाने गळ्यात घातलेली चैन ऋषभ पंतची आहे.

उर्वशी रौतेलाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. तिने ऑफ-शोल्डर जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यावर सोनेरी फुलांची रचना आहे. तिने हा पोशाख सिल्व्हर आणि डायमंड चेनसह जोडला. मात्र या जाहिरातीत तिने घातलेल्या एक वस्तूने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे उर्वशीने गळ्यात घातलेली चेन.

 

View this post on Instagram

 

ही चेन पाहून लोकांना ऋषभची पुन्हा आठवन झाली आहे.उर्वशी रौतेलाने गळ्यात घातलेली चैन ऋषभ पंतची आहे असा दावा केला जात आहे.तिच्या या व्हिडिओनंतर त्यातील स्क्रिनशॉट ऋषभच्या जुन्या फोटोबरोबर जोडण्यात आला आहे. या दोन्ही फोटोंमध्ये दोघांनी परिधान केलेल्या चेन सारख्याच आहेत. सोशल मीडियावर हे ट्वीट तुफान व्हायरल झाले आहे. तिच्या फोटोवर अनेक कमेंटही येत आहे.

उर्वशी आणि ऋषभ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी गेले काही महिने सुरू आहेत. दोघांनीही एकमेकांवर सोशल मीडियावरच टीकाही केली होती. नाव न घेता त्यांच्यातील हे सोशल मीडिया युद्ध सुरू होते. त्यानंतर उर्वशीने ऋषभ ज्या मैदानांवर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार होता तिथे तिथे हजेरी लावलेली. आता उर्वशी ऑस्ट्रेलियात आहे. ती ऋषभसाठी याठिकाणी पोहोचल्याचे बोलले गेले. याशिवाय ती सोशल मीडियावर काही प्रेमयुक्त किंवा प्रेमभंगाच्या शायरी शेअर करते, त्याही ऋषभ पंतसाठी असतात असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टॉपलेस होऊन उर्फीने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! युजर्स म्हणाले, ‘हा काय मूर्खपणा’
अरर! गाैरीनं बिग बाॅसला धमकी देत केलं ‘ब्लॅकमेल’, मग काय करणनं चागंलंच फटकारलं

हे देखील वाचा