आपल्या सुंदर अभिनयाने, डान्सने, वेगवेगळ्या लुक्सने बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतात. सोशल मीडियावर तर नेहमीच अभिनेत्री नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय असतो. अशात सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अतिशय सुंदर असणाऱ्या उर्वशीचा अभिनय देखील तिच्या सारखाच दमदार आहे. आपल्या सुंदरतेमुळे तिच्या लुक्समुळे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचे चाहते कायमच तिच्या नवनवीन फोटोची किंवा व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात.
उर्वशी देखील तिच्या फॅन्सला कधीही नाराज करत नाही. नेहमी ती तिचे फोटो, व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या उर्वशीने नुकताच तिचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘सिंपल-डिंपल’ या गाण्यावर ठुमके मारत आहे. तिने या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, हिऱ्यांचे आकर्षक कानातले घातले आहेत. सोबतच तिने केसांची हाय पोनी बांधली आहे. तिच्या या वेस्टन लूकने चाहते घायाळ झाले असून तिच्या डान्सने सर्वांना वेड लावले आहे. व्हिडिओमध्ये तिचा न्यूड शेडचा आय मेकअप आणि त्यावर तिची लाल रंगाची लिपस्टिक लक्षवेधी ठरत आहे.
तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे. काहींनी कमेंट्समध्ये तिचे भरभरून कौतुक केले आहे. एका चाहत्याने तिला कमेंट करत म्हटले आहे की,” अमेझिंग स्माईल, रेस्पेक्टफुल आणि रिमार्केबल वूमन आहेस तू.”
नुकतेच तिने गुरु रंधावासोबत ‘डूब गये’ आणि मोहम्मद रमजानसोबत ”वर्साचे बेबी’ हे म्युझिक अल्बम केले असून, या गाण्यासाठी तिला भरभरून प्रतिक्रिया मिळत आहे. लवकरच उर्वशी ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीज मध्ये झळकणार आहे. यामध्ये ती रणदीप हुड्डा सह मुख्य भूमिका साकारणार आहे. ही संपूर्ण कहाणी सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. उर्वशी रौतेला लवकरच तमिळ चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर ती एका द्विभाषिक थ्रिलरमध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ