भारतीय क्रिकेटर रिषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये रिषभ पंत गंभीरित्या जखमी झाला असून त्याची गाडी पूर्णपणे जळाली आहे. सकाळी रिषभ दिल्लीहून घरी येत असाताना भरधाव वेगात असणाऱ्या पंतच्या स्पोर्ट कारचा भीषण अपघात झाला असून त्याला देहरादूनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अनेक चाहते रिषभच्या काळजीपोटी प्रार्थना करत आहेत. यामध्येच अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Uravshi Rautela)आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियामुळे सतत चर्चेत असते. अनेकदा तिचे आणि रिषभचे नाव सतत जोडले जाते. नुकतंच माहिती मिळाली आहे की, भारतीय क्रिकेटर रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही बातमी अभिनेत्रीला मिळताच उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.
उर्वशीने तिचा एक फोटो शेअर केला ज्याला तिने “मी प्रार्थना करत आहे,” असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबत तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढखऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून तिने पांढऱ्या रंगाचे हार्ट एमोजी शेअर केले आहेत. उर्वशीने फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, “विहनी रिषभ पंतचा अपघात झाला आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, “रिषभचा अपघात झाला आहे, तुला समजलं की, नाही.”
सांगायचे झाले तर, रिषभ हा भारतीय संघामधील धडाकेबाज खेळाडू आहे, त्याच्या अपघातनंतर अनेक चागत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याशिवाय चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दिल्लीहून परत येत असताना तो मर्सडीज कारमध्ये प्रवास करत होता. हरिद्वार जिल्ह्यामध्ये रुरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर रिषभच्या कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये रिषभ गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘केजीएफ 3’ मध्ये कॅमिओ करतोय का हार्दिक? सोशल मीडियावर पोस्ट होतेय तुफान व्हायरल
‘राजकारण्यांसाठी कालकार बळीचा बकरा…’, बॉलिवूमध्ये बॅन केल्यामुळे माहिरा खानने व्यक्त केला संताप