Wednesday, April 17, 2024

‘राजकारण्यांसाठी कालकार बळीचा बकरा…’, बॉलिवूमध्ये बॅन केल्यामुळे माहिरा खानने व्यक्त केला संताप

पासकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आपल्या कामगिरीने आणि अदाकारिने इंडसट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. फक्त पाकिस्तानच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. माहिरा सध्या तिचा नवीन चित्रपट मौला जट याच्या चांगल्या कामगिकरीमुळे आनंद लुटत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान बॉलिवूडमधील पाकिस्तान कलाकारांना बॅन करण्याच्या मुद्दयावरुन संताप व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) ही आपल्या दमदार अभिनयाशिवया आपल्या परखड वक्तव्यासाठी देखिल ओळखली जाते. तिने पाकिस्थानमधील चित्रपटांशिवया टीव्हीवरही काम केले आहे. त्याशिवया तिने बॉलिवूडमधील शाहरुख खान (Shaharukh Khan) स्टारर ‘रईस’ (Raees) चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम केले होते. या चित्रपाटनंतर भारत देशातही अभिनेत्रीचे फॅनफोलोविंगमध्येही वाढ झाली. मात्र, यानंतर अभिनेत्रीला दुसरी संधी मिळाली नाही.

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकारणामुळे कालाकार आणि गायकांना भारतामध्ये काम करण्यापासून बॅन केले होते. त्यामुळे 2017 साली ‘रईस’ चित्रपटामध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री महिरा खान हिला पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, इंटरनॅशन इवेंटमध्ये ती बॉलिवूड कालाकारांशी भेटत असते. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान याच मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. तिच्या मते ‘भारतीय आणि पाकिस्तान दोन्ही कलाकार बळीचा बकरा बनले आहेत.’

महिरा खान हिने नुकत्या दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “भारतात तसेच पाकिस्तानमध्ये कलाकारांना “सॉफ्ट टार्गेट” मानलं जातं. दुसऱ्या शब्दांत, दोन्ही देशातील कलाकार हे राजकारण्यांसाठी बळीचे बकरे आहेत.” यानंतर महिराने भारतामध्ये काम करण्यचा अनुभावाबद्दल सांगितले की, ‘भारतात काम करण्याचा माझा काळ सर्वात आश्चर्यकारक होता.. मी अजूनही अनेक लोकांच्या संपर्कात आहे आणि खूप प्रेम आहे तिथे. दुर्दैवाने, आपण सॉफ्ट टार्गेट आहोत, मग आपण इथे पाकिस्तानमध्ये आहोत आणि ते तिथे भारतात आहेत, कारण आपण कलाकार आहोत आणि आपण कलेच्या धाग्याने जोडलेले आहोत, जे एकमेकांना कुठेतरी भेटतात.”

महिराने पुढे सांगितले की, “त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीपेक्षा एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. आताही सोशल मीडियावर आपण काय लिहितो, याची खूप काळजी घेतो. असे नाही की, आम्ही एकमेकांशी बोलत नाही, असे नाही की आम्ही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. असे नाही की आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये एकमेकांना पाहत नाही. हे इतकेच आहे की आम्ही खरोखर केवळ स्वतःचे संरक्षण करत नाही तर एकमेकांचे रक्षण करतो.”

मिहिराने राजकारण्यांविषयी सांगितले की, “दुर्दैवाने, हे फक्त राजकारण आहे, ही वैयक्तिक समस्या नाही. दोन्ही बाजूंनी जेव्हा एखाद्याला ‘बळीचा बकरा’ लागतो तेव्हा आपण नेहमीच पहिले असू… पण ते अधिक चांगलं होतं. समजा कोणी सत्तेत असेल तर ते चांगले होईल. आमचा सॉफ्ट टार्गेट म्हणून वापर करू नका. तुम्ही कल्पना करू शकता का की दोन्ही देश कलेवर एकत्र काम करत आहेत? ते किती सुंदर असेल.”

अभिनेत्री महिराने दोन्ही देशांना कलाक्षेत्रामध्ये एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त करत असून तिने राजकारणांमुळे हे होणं अशक्य आहे असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
कंगना रनौतने पोस्ट शेअर करत हिराबेन मोदीजींच्या निधनावर व्यक्त केले दु:ख
भारीच की! मिथिलाने शेअर केले भन्नाट फोटो, एकदा पाहाच

 

हे देखील वाचा